
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
पारनेर तालुक्यातील (Parner) वाडेगव्हाण-राळेगणसिद्धी रोडवर (Wadegavhan-Ralegan siddhi Road) शुक्रवारी (दि.26) झालेल्या खुन प्रकरणातील (Murder Case) संशयिताला पकडयात सुपा पोलिसांना (Supa Police) यश आले असुन चार दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर सुपा पोलिसांनी मंगळवारी (दि.30) संशयितास त्याच्या पिंपळनेर (Pimpalner) येथील राहत्या घरून अटक (Arrested) करण्यात आली. मद्यपी संशयित व खून (Murder) झालेली व्यक्ती मित्र असल्याचे पोलीसांनी सांगीतले.
भाऊसाहेब विठ्ठल वाघुले (रा. पिंपळनेर, ता. पारनेर) असे अटक (Arrested) करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी 07.30 वाजेच्या सुमारास राळेगण-वाडेगव्हाण या पारनेरकडे (Parner Road) जाणारे रोडवर अंकुश भिमाजी कोठावळे (रा. सांगवी सुर्या ता. पारनेर) याच्या डोक्यात दगड घालुन खुन (Murder) करण्यात आला असल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी सुपा पोलीसांनी खुनाचा गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला होता.
हा गुन्हा उघडकीस आणणेसाठी पोलीस अधिक्षक राकेश ओला (SP Rakesh Ola) यांनी सुचना दिल्याने पोलीस निरिक्षक ज्योती गडकरी व स्थानिक गुन्हे शाखा (LCB) यांनी समांतर तपास सुरू केला. विविध 4 पथके रवाना करण्यात आली होती. सदर गुन्हयात कोणताही तांत्रिक पुरवा नसल्याने तपासात अडचणी येत होत्या. त्याचवेळी गुप्त बातमीदारामार्फतीने सदर संशयिताचे वर्णन मिळाले. त्या वर्णनावरून व सी.सी.टी.व्ही फुटेजच्या मदतीने संशयित भाऊसाहेब विठ्ठल वाघुल यास ताब्यात घेवुन त्याचेकडे विचारपुस करता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर अधिक्षक प्रशांत खैरेे, उपविभागीय अधिकारी अनिल कातकडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, सुप्याच्या पोलीस निरिक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक धाकराव, काळे, पालीस कर्मचारी खंडेराव शिंदे, मखरे, रमेश शिंदे, वेठेकर, यश ठोंबरे, संदीप पवार, कल्याण लगड, भिमराज खर्से, कुसाळकर यांनी केली आहे.