राजुरीत बिबट्यावर रानडुकरांचा हल्ला

राजुरीत बिबट्यावर रानडुकरांचा हल्ला
File Photo

राजुरी |वार्ताहर| Rajuri

राहाता (Rahata) तालुक्यातील राजुरी (Rajuri) येथील भालेराव वस्ती येथे गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास रानडुकरांनी बिबट्यावर हल्ला (leopard Attack) केल्याने बिबट्या नारळाच्या झाडावर चढला.

राजुरी येथे दक्षिण मुखी हनुमान मंदिराकडे जाणार्‍या रोड लगतच भालेराव, बोडखे, खर्डे, आहेर, वामन यांच्या वस्त्या आहे. या परिसरात ओढा व नाल्याची जागा असल्यामुळे या होड्यांना कायम पाणी असते. त्यामुळे या परिसरात बिबटे, वाघ, रान डुक्कर, हरण, मोर असे विविध प्राणी कायम दिसत असतात. यातील काही बिबटे पकडून नेले असतानाही काही बिबटे व बछडे या परिसरात अनेक शेतकर्‍यांनी दिवसा व रात्रीच्यावेळी पाहिलेले आहेत.

रानडुकरापासून शेतातील पिकांचे नुकसान (Crops Loss) मात्र होताना दिसत आहे. गुरुवारी पहाटेच्या वेळी जुन्या गावाशेजारील रस्त्याजवळ राहणार्‍या बाबासाहेब भालेराव व संजय भालेराव यांच्या वस्तीच्या कडेला बिबट्याने रानडुकरावर हल्ला केला की काय मोठ्याने किंकाळण्याचा आवाज आला. यावेळी बाबासाहेब भालेराव यांचे चिरंजीव अनिकेत यांना जाग आली. त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिले असता चक्क बिबट्या नारळाच्या झाडावर चढलेला त्यांना दिसला. त्यानंतर खाली काही रान डुक्कर दिसले.

यानंतर घरच्यांना आवाज देऊन जागे केले परंतु तोपर्यंत रानडुक्कर व बिबट्या खाली उडी मारुन निघून गेल्याचे त्यांनी पहिले. या परिसरात गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याचे व वाघाचे रानडुकरचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात वाढत चालली असून याचा बंदोबस्त वन अधिकार्‍यानी करावा अशी मागणी या भागातील शेतकरी बाबासाहेब भालेराव, संजय भालेराव, अनिकेत भालेराव, विजय बोडखे, राजेंद्र बोडखे, अण्णासाहेब बेंद्रे, गोपीनाथ भालेराव, भाऊसाहेब भालेराव, विष्णू खर्डे, नानासाहेब आहेर, शिवाजी आहेर, विलास आहेर, वामन फिटर, कल्पेश आहेर, जालिंदर बेंद्रे, रघुनाथ बेंद्रे यांच्यासह शेतकर्‍यांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com