बाभळेश्वर- श्रीरामपूर रस्त्यावर ट्रक व मोटरसायकलचा भीषण अपघात

दोन ठार तर एक जखमी !
बाभळेश्वर- श्रीरामपूर रस्त्यावर ट्रक व मोटरसायकलचा भीषण अपघात

राजुरी |वार्ताहर| Rajuri

श्रीरामपूर-बाभळेश्वर या राज्य मार्गावरील ममदापूरनजीक ट्रक व मोटरसायकल यांचा अपघात होऊन

यामध्ये दोन जण ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

श्रीरामपूरकडून ट्रक क्रमांक एमएच 12-एच बी 4001 हा बाभळेश्वरकडे जात असताना यादव मळा-ममदापूरजवळ असणार्‍या टिळेकर वस्तीजवळ या ट्रकने बाभळेश्वरकडून येणार्‍या दुचाकी क्रमांक एम एच 12- डि, क्यू, 6149 या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात राजेंद्रकुमार बाबूलाल रामकिसन गुजर, राहुल मेहरा हे मोटरसायकलस्वर जबर जखमी झाले. हुल मेहरा व रामकिसन गुजर या दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने या जखमींना प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेवून गेले असता उपचार सुरु असताना दोघांचाही मृत्यू झाला.

या अपघातात अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर सदरचा ट्रक दोनशे फूट लांब अंतरावर उसात जाऊन थांबला. हे अपघातग्रस्त व्यक्ती श्रीरामपूर येथे फरशी बसवण्याचे काम करत होते. आजपासून सुरू होणार्‍या लॉकडाऊनमुळे हे तिघेही आपल्या राजस्थान, जयपुर गावी जाण्यासाठी निघाले होते; परंतु त्यांना गाडी न मिळाल्यामुळे ते पुन्हा बाभळेश्वरकडून-श्रीरामपूरकडे जात असताना हा भीषण अपघात झाला आहे.

यानंतर ट्रक चालक व क्लिनर तेथून पसार झाले असून घटनेची माहिती लोणी पोलीस स्टेशनला कळताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली असून जखमींना प्रवरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास लोणी पोलिस स्टेशनचे एपीआय समाधान पाटीलसह त्यांचे सहकारी पोलीस करीत आहे. या अपाघातानंतर या ट्रकचा चालक व क्लिनरदोघेही ट्रक तेथेच टाकून त्यांनी तेथून पळ काढला.

याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात काल रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. त्यामुळे या अपघाताची अधिक माहिती पोलिसांकडून मिळू शकली नाही.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com