राजूरमध्ये पिचड-विखे भेटीने राजकीय तर्कवितर्कांना उधाण
सार्वमत

राजूरमध्ये पिचड-विखे भेटीने राजकीय तर्कवितर्कांना उधाण

Arvind Arkhade

अकोले|प्रतिनिधी|Akole

राज्याचे माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल राजूर येथे जाऊन माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची भेट घेतली. यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर हेही उपस्थित होते.

काल दुपारी आ. विखे पाटील राजूर येथे गेले. तेथे त्यांनी पिचड पिता-पुत्र व गायकर यांचा विखे पाटील यांनी सत्कार केला. सुमारे तासभर त्यांची पिचड पिता पुत्र व गायकर यांचे सोबत बैठक झाली.

राजूर येथे जाऊन विखे पाटील यांनी एवढा आवर्जून सत्कार का केला हे समजले नाही. यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी राजूरच्या पेढ्याची भेट दिली. नक्की ही सदिच्छा भेट होती की राजकीय भेट होती याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com