राजूर ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत जाहीर

राजूर ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत जाहीर

राजूर |वार्ताहर| Rajur

अकोले तालुक्यातील राजूर ग्रामपंचायत निवडणुकीसाठीचे आरक्षण मंगळवारी जाहीर करण्यात आले. 2011 च्या जनगणनेनुसार राजूरची एकूण लोकसंख्या ही 10,046 असून अनुसूचित जातीची लोकसंख्या 861 आहे तर अनुसूचित जमातीची संख्या 4043 आहे. राजूर ग्रामपंचायतीचे एकूण सहा वॉर्ड असून सदस्य संख्या 17 आहे. यावेळी वॉर्ड क्र.2 म्हणजे लक्ष्मी नारायण वॉर्डमध्ये दोनच सदस्य असल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे.

आरक्षण सोडतीनुसार वॉर्ड क्र. 1 मध्ये एसटी. पुरुष, एस.सी.व्यक्ती, सर्वसाधारण महिला, वॉर्ड क्र.2 मध्ये सर्वसाधारण महिला, एसटी. व्यक्ती, एसटी. महिला, वॉर्ड क्र. 3 मध्ये सर्वसाधारण व्यक्ती, एसटी. महिला वॉर्ड क्र.4 मध्ये सर्व साधारण व्यक्ती, सर्वसाधारण महिला, एसटी. महिला वॉर्ड क्र. 5 मध्ये सर्वसाधारण महिला, एस. टी. महिला, एसटी. व्यक्ती वॉर्ड क्र.6 सर्वसाधारण व्यक्ती, एसटी. महिला, एसटी व्यक्ती याप्रमाणे आरक्षण जाहीर झाले आहे.

मावळत्या ग्रामपंचायत सदस्यांमध्ये माजी उपसभापती दत्तात्रय देशमुख, माजी सभापती बाळासाहेब देशमुख, माजी सरपंच गणपत देशमुख, माजी उपसरपंच गोकुळ कानकाटे, राजूर सोसायटीचे व्हा. चेअरमन शेखर वालझाडे यांच्या पत्नी सारिका वालझाडे यांच्यासाठी सोयीस्कर आरक्षण आल्याने त्यांनी सुस्कारा सोडला आहे. भाजपाचे शहर अध्यक्ष संतोष बनसोडे हे वॉर्ड क्र.5 व 6 मध्ये इच्छुक होते मात्र 5 मध्ये महिला आरक्षण आल्याने बनसोडेंबरोबर वॉर्ड क्र. 6 मध्ये नंदूबाबा चोथवे, राजू चोथवे यांची तिकीटासाठी रस्सीखेच असेल.

तसेच वॉर्ड क्र.3 म्हणजे लक्ष्मीनारायण वॉर्ड मध्ये दोनच जागा त्यामध्ये सर्वसाधारण व्यक्तीसाठी एकच जागा आल्याने येथे माजी सरपंच काशिनाथ भडांगे, माजी सदस्य भास्कर येलमामे, सामाजिक कार्यकर्ते संतोष मुर्तडक व आमदार डॉ. किरण लहामटे समर्थक रामा मुर्तडक यांच्यमध्ये जोरदार रस्सीखेच होणार आहे. आगामी राजुर ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी माजी आ. वैभवराव पिचड समर्थक जोरदार प्रयत्न करणार तर आमदार डॉ. लहामटे समर्थक ती सत्ता आपल्याकडे खेचून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार हे निश्चित. त्यामुळे आगामी काळात राजूर ग्रामपंचायत निवडणुकीने राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com