माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह दीडशे जणांविरुद्ध गुन्हा
सार्वमत

माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह दीडशे जणांविरुद्ध गुन्हा

दूध दरवाढीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Sachin Daspute

Sachin Daspute

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

दूध दर वाढीसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमान शेतकरी संघटनेंच्या वतीने हजारों शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. करोना फैलाव होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याप्रकरणी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह 125 ते 150 जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई तन्वीर सलीम शेख यांनी फिर्याद दिली आहे.

गुन्हा दाखल झाल्यामध्ये माजी खासदार राजू शेट्टी, रविंद्र बापूसाहेब मोरे, प्रकाश देठे, मंगेश आजबे, सुनील लोंढे, भीमराव धांडे, ऋषीकेश हुणे, स्नेहल फुंदे, पूजा मोरे व इतर 125 ते 150 जणांचा समावेश आहे.

दुधाला प्रति लिटर ३५ रुपये भाव देऊन, दुध उत्पादक शेतकऱ्यांना ५ रुपये अनुदान प्रत्येकाच्या खात्यात जमा करावी आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. विनाकारण ठोस कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणे, तसेच विना परवाना मोर्चा काढून एकत्र येऊन घोषणा देऊन कोविड 19 रोगाचा फैलाव होईल हे माहीत असतांना देखील त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे भंग केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com