पोषण आहार जागृतीबाबत महिलांची भूमिका महत्वाची - राजश्री घुले

पोषण आहार जागृतीबाबत महिलांची भूमिका महत्वाची - राजश्री घुले

भेंडा |वार्ताहर| Bhenda

कुटुंबाच्या सुदृढ आरोग्यासाठी परसबागेत पोषण बाग पिकविण्याची गरज आहे. पोषण आहार जागृतीबाबत महिलांची भूमिका महत्वाची असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील यांनी केले.

भेंडा येथील श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या दहिगाव-ने कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने दि.17 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय पोषण दिन साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून राजश्रीताई घुले पाटील बोलत होत्या. रोटरी इनर व्हीलच्या संस्थापिक अध्यक्षा डॉ. मनीषा लड्डा, समाज विकास सेवा समिती नेवासाच्या सिस्टर बिंदू जोसेफ, इफकोचे महाप्रबंधक डी. बी. देसाई, पंचायत समिती शेवगाव बचत गट विभागाचे प्रभाग समन्वयक दीपक अवंतकर व दिनेश काशिद तसेच दहीगाव-ने गावचे सरपंच सुभाष पवार, उपसरपंच राजाभाऊ पाऊलबुद्धे, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्याम सुंदर कौशिक व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रास्ताविकात केंद्र प्रमुख डॉ. कौशिक यांनी पाचवा राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रमाची थीम महिला आणि स्वास्थ्य, बच्चा आणि शिक्षाचे विवरण करताना, पिकांच्या जैवसंपृक्त वाणांचे महत्त्व विषद केले. केव्हीके दहीगाव-ने मार्फत शेतकरी व शेतकरी महिलांसाठी राबविण्यात येणा-या कार्यक्रमांची माहिती उपस्थित शेतकरी व महिलांना त्यांनी दिली.

डॉ. मनीषा लड्डा म्हणाल्या, महिलांमध्ये जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होणारे आजार आणि ते आजार होऊ नये म्हणून, संतुलित आहार कसा असावा तसेच आपला आहार पोषक व्हावा, संतुलित व्हावा याकरता सद्य दैनंदिन आहारमध्ये काय बदल केले पाहिजे.

पाचव्या राष्ट्रीय पोषण दिन कार्यक्रम निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ऑनलाईन दूरदृश्यप्रणाली माध्यमातून उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते केव्हीके प्रक्षेत्रावर वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमास शास्त्रज्ञ नंदकिशोर दहातोंडे, राहुल पाटील, प्रकाश हिंगे, अनिल देशमुख, प्रविण देशमुख, दत्तात्रय वंजारी, संजय थोटे व गणेश घुले तसेच मोठ्या संख्येने महिला शेतकरी उपस्थित होते. शास्त्रज्ञ नारायण निबे यांनी सूत्रसंचालन केले तर सचिन बडधे यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com