
बोधेगाव |प्रतिनिधी| Bodhegav
शेवगाव तसेच मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकास कामे प्रलंबीत आहेत. बाहेरील माणूस निवडणुकीपुरता येईल आणि जाईल. ते विकास करत नाहीत, आपल्याला हक्काचा लोकप्रतिनिधी नसल्यामुळे शेवगावचा व मतदारसंघाचा विकास खुंटला आहे. असा आरोप आ. राजळे यांचे नाव न घेता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री चंद्रशेखर घुले यांनी केला.
बालमटाकळी येथे त्या बोलत होत्या. घुले म्हणाल्या, लोकनेते मारुतराव घुले पाटील यांनी समाजकारणाची दिलेली शिकवण जोपासून राजकारण बाजूला ठेवून माजी आ. नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले, यांच्या मार्गदर्शन खाली विकास कामे अहोरात्र सुरू आहेत. विकास कामांचा डोंगर उभा असतानाही शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी, रस्ते आदी विविध प्रश्न मार्गी लागली आहेत. अजूनही अनेक कामे प्रलंबित आहेत. त्यासाठी अगामी निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष जो उमेदवार देतील त्यांना साथ द्यावी व आपला माणूस ओळखावा असे त्यांनी सांगितले. यावेळी मोहनराव देशमुख यांनी विचार व्यक्त केले.
कार्यक्रमास शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ क्षितिज घुले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कल्याण नेमाने, जिप सदस्या सौ संगीता दुसंगे, मोहनराव देशमुख, रामनाथ राजपुरे, भाऊराव भोंगळे, एकनाथ कसाळ, भगवान बाबा मल्टीस्टेटचे मयूरराजे वैद्य, सेवा संस्थेचे अध्यक्ष हरीचंद्र घाडगे, बाजार समितीचे संचालक प्रल्हाद शिंदे, सुधाकर तहकीक, संभाजी तिडके, बोधेगावचे माजी सरपंच रामजी अंधारे, बाळासाहेब देशमुख, छगनराव राजपुरे, व्यंकट देशमुख, प्रशांत देशमुख, बोधेगाव सेवा संस्थेचे अध्यक्ष अनिल घोरतळे, उपाध्यक्ष प्रसाद पवार, शेषेराव वंजारी,चंद्रकांत गरड, भानुदास गलधर, सर्जेराव घोरपडे, वसंतराव घाडगे, भाऊसाहेब बामदळे, राम बामदळे आदीे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजार समितीचे संचालक रामनाथ राजपुरे यांनी केले तर सूत्रसंचालन राम तांबे यांनी केले तसेच आभार बाबासाहेब देशमुख यांनी मानले.
दूरदृष्टीची चुणूक
कार्यक्रमात शेतकरी रंगनाथ गोर्डे हे काही सूचना व प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र ही बाब कोणाच्या लक्षात आली नाही. मात्र व्यसपीठावर उपस्थित असलेले सभापती डॉ. क्षितिज घुले यांच्या हा प्रकार लक्षात आला. कार्यक्रम संपताच त्यांनी श्री गोर्डे यांची आवर्जून भेट घेऊन त्यांची समस्या जाणुन घेतली. त्यांच्याशी सविस्तर चेर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे अश्वासन दिले. लोकनेते मारूतराव घुले सामान्य जनतेला असाच नेहमी न्याय देण्याचा प्रयत्न करत. याची अनेकांना आठवण झाली. त्याचांच वारसा तिसरी पिढीही सक्षमपणे चालवत असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी बोलून दाखवले.