‘राजहंस’ने कायम उत्पादकांचे हित जोपासले - ना. थोरात

‘राजहंस’ने कायम उत्पादकांचे हित जोपासले - ना. थोरात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर (Sangamner) तालुक्यात दररोज सहा लाख लिटर दूध (Milk) उत्पादन होत आहे. सहकारी दूध संघामुळे (Co-operative Milk Union) खाजगी दूध संघाच्या (Private Milk Association) मनमानीला बंधने आहेत. राजहंस दूध (Rajhans Milk) संघाने कायम दूध उत्पादकांचे हित जोपासून दूध उत्पादकांच्या जीवनात समृद्धी निर्माण केल्याचे गौरवोद्गार राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी काढले आहे.

कोकणगाव (Kokangav) येथे संगमनेर (Sangamner) तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने पशुवैद्यकीय मेडिकलचे उद्घाटन व सॉर्टेड सिमेन्सचे वितरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दूध संघाचे व महानंदाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख (Mahananda President Ranjit Singh Deshmukh) होते. तर व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे (MLA Sudhir Tambe), बाजीराव पा. खेमनर, उपाध्यक्ष साहेबराव पा. गडाख, आर. बी. रहाणे, डॉ गंगाधर चव्हाण, पांडुरंग सागर, बाबासाहेब गायकर, संतोष मांडेकर, सुभाष सांगळे, सौ. प्रतिभाताई जोंधळे, सुभाष गुंजाळ, राजेंद्र चकोर, सुभाष आहेर, विलास वर्पे, सरपंच आशाताई जोंधळे, उपसरपंच अरुण जोंधळे, साहेबराव जोंधळे, शिवाजी पवार, लक्ष्मण जोंधळे, पोपट शिंदे, चिमाजी जोंधळे, शिवाजी जोंधळे आदी उपस्थित होते.

यावेळी नामदार थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) म्हणाले, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात (Sahakar Maharshi Bhausaheb Thorat) यांनी निर्माण केलेल्या सहकारामुळे तालुक्यात समृद्धी आली आहे. हा सहकार प्रत्येकाने जपला पाहिजे. एक रुपयाच्या फायद्यासाठी काही लोक खाजगी दूध संघांना दूध घालतात. आणि जेव्हा अडचण येते तेव्हा पुन्हा सहकारी दूध संघाकडे येतात. राजहंस दूध संघाने (Rajhans Milk Union) कधीही भेदभाव केला नाही. कायम सभासदांचे हित जोपासले. तालुक्यात झालेल्या क्रांतीमुळे आज दररोज सहा लाख लिटरची विक्रमी दूध उत्पादन होते आहे. शेतकर्‍यांचे हित जोपासणारे पुरोगामी विचारांचे महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) व काँग्रेस पक्ष (Congress Party) यांच्यासह गोरगरिबांच्या जीवनात समृद्धी निर्माण करणार्‍या सहकाराची कायम आपण एकनिष्ठ राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार डॉ. तांबे (MLA Dr. Sudhir Tambe) म्हणाले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरचा सहकार हा लोकाभिमुख ठरला आहे. सहकार चळवळीला आपण ताकद दिली पाहिजे. ती निष्ठेने जपली पाहिजे.

महानंदाचे अध्यक्ष रणजित देशमुख (Mahananda President Ranjit Singh Deshmukh) म्हणाले, अडचणीच्या काळात राजहंस दूध संघ शेतकर्‍यांच्या पाठीशी उभा राहिला. या दूध संघा मुळेच शेतकर्‍यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी आली आहे. मात्र मागील काही दिवसांमध्ये खाजगीवाले विशेष व्यक्तीचा वापर करतात त्यातून शेतकर्‍यांमध्ये चुकीचा गैरसमज निर्माण होतो. आपण आपल्या तत्वांशी बांधिलकी राहिले पाहिजे. सहकार आपला आहे तो आपण जपला पाहिजे.

यावेळी भाऊसाहेब जोंधळे, शिवाजी जोंधळे, सुखदेव जोंधळे, प्रभाकर बेंद्रे, डॉ. प्रशांत पोखरकर, डॉ. सुजित खिलारी, भाऊसाहेब आहेर, विनायक वैद्य, बाळासाहेब शिंगोटे, डॉ. दत्तात्रय जोंधळे, भाऊसाहेब आहेर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत उपसरपंच अरुण जोंधळे यांनी केले प्रास्ताविक सुरेश जोंधळे यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ व रवी नेहे यांनी केले तर उपाध्यक्ष साहेबराव गडाख यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com