सदस्य परजणे
सदस्य परजणे
सार्वमत

दुग्ध व्यवसायात अस्थिरता वाढल्याने शासनाने पाच रुपये अनुदान द्यावे : परजणे

Arvind Arkhade

कोपरगाव|प्रतिनिधी|Kopargav

दुग्धव्यवसाय अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षीत बेरोजगार, अल्पबचत गट यांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असून अनेकांना त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झालेला असताना सद्याच्या कोरोना महामारीच्या संकटामुळे रोजगाराची मोठी समस्या निर्माण झालेली आहे.

दुधाचे दर अस्थिर होवून शेतकर्‍यांच्या दैनंदिन जीवनमानावर विपरित परिणाम होत आहे. या गंभिर समस्येचा विचार करुन शासनाने दूध उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिलिटर 5 रुपये प्रमाणे अनुदान उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी शासनाकडे केली आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांना पाठविलेल्या निवेदनातून परजणे यांनी सद्याच्या दुग्ध व्यवसायातील अडचणी निदर्शनास आणून दिल्या. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ राज्यातील सहकारी दूध संघांकडून रुपांतरासाठी दूध घेत असले तरी एकूण संकलनाच्या अतिशय नाममात्र प्रमाणात ते खरेदी केले जात आहे.

ते देखील 27 जुलै 2020 पासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सद्यःस्थितीत शासनाने दूध उत्पादकांना खरेदी केलेल्या दराप्रमाणे सर्व दुधावर दर द्यावा लागत आहे. या गंभिर समस्येचा विचार करुन शासनाने राज्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांना दुधावर प्रतिलिटर 5 रुपये प्रमाणे अनुदान उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी परजणे यांनी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com