जगताप यांनी काँग्रेस, भाजपचे लोक सोडून निवडणूक लढवून दाखवावी

नागवडे यांचे आव्हान
जगताप यांनी काँग्रेस, भाजपचे लोक सोडून निवडणूक लढवून दाखवावी

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

नागवडे कुटुंबियांनी राजकीय त्याग करत अनेकवेळा जगताप यांना मदत केली आहे. साजन पाचपुते यांनाही काष्टीत सरपंच होण्यासाठी मदतच केली आहे. स्वत:चा स्वार्थ असेल तेव्हा नागवडेंना बरोबर घेतले जाते. राहुल जगताप यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनीही भाजप आणि काँग्रेसची बरोबर घेतलेली माणसे सोडून निवडणूक लढून दाखवावी,असे आव्हान श्रीगोंदा साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी येथे दिले.

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू असून नागवडे-पाचपुते विरोधात माजी आमदार राहुल जगताप यांचे पॅनल असणार आहे. या पार्श्वभूमीवर नागवडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यात राजेंद्र नागवडे म्हणाले, आमच्या कुटुंबांनी तालुक्यातील काही नेत्यांना मदत करण्याचे काम केले. मात्र उपकाराची जाण मदत करणार्‍यांना राहिली नाही. नागवडे कुटुंबांनी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम कधी केले नाही.

नुकत्याच झालेल्या खरेदी विक्री संघाची निवडणूक करताना उमेदवारीचे निर्णय घेताना मनात कोणतीही शंका ठेवली नाही. मात्र या निवडणुकीत नागवडे-पाचपुते यांचे उमेदवार कसे पडतील याकडे त्यांनी जास्त लक्ष दिले.त्यांना मदत केल्याची घोड चूक झाल्याची खंत नागवडे यांनी व्यक्त केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com