साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय अधिकारीपदी राजेंद्र जगताप

साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय अधिकारीपदी राजेंद्र जगताप

शिर्डी (शहर प्रतिनिधी) / Shirdi - आशिया खंडातील सर्वात मोठ्या मेगा किचनमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली असून करोडो साईभक्तांच्या जिव्हाळ्याचा साईबाबांचा भोजनप्रसादात तसेच प्रसादालयातील कार्यपद्धतीत आणखी भक्ताभिमुख सेवासुविधा वाढविण्यासाठी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या आदेशानुसार प्रयत्न करणार असल्याची माहिती नवनियुक्त प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप (rajendra jagtap)यांनी दिली.

साईबाबा संस्थानच्या (Shri Saibaba Sansthan Trust) प्रशासकीय अधिकारीपदी शिर्डी गावचे भुमीपुत्र राजेंद्र जगताप तसेच संजय जोरी यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर राहाता तालुका शिवसेनेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना नेते कमलाकर कोते, विजय जगताप तालुकाप्रमुख संजय शिंदे, सचिन कोते, अमोल गायके, राहुल गोंदकर, महेश महाले, जयराम कांदळकर, विलास कोते, सुनील बारहाते, अनिल पवार, नवनाथ विश्‍वासराव, संतोष जाधव, बाळासाहेब जगताप, हरिराम रहाणे, अमोल गायके, बाळासाहेब जेजुरकर, सचिन बोर्डे, संतोष कुर्‍हाडे, शरद मोरे, संतोष देसाई यांच्या अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना श्री. जगताप यांनी सांगितले की, साईबाबांचा रुग्णसेवेचा वारसा जोपासलेल्या साईबाबा सुपर स्पेशालिटी व साईनाथ रुग्णालयात त्याचप्रमाणे ज्ञानदानाचे काम करत असलेल्या साईबाबा शैक्षणिक संकुलासह तिनही महत्त्वाच्या विभागात प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर माझ्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी मोठी जबाबदारी दिली आहे. याठिकाणी कामकाज करत असतांना आशिया खंडातील सर्वात मोठ्या प्रसादालयात प्रथम प्राधान्य देणार असून त्याबरोबरच राज्यात नावलौकिक प्राप्त असलेल्या साईबाबा रुग्णालयात रुग्णांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com