राजापूर येथे बिबट्याचा धुमाकूळ; दोन शेळ्या व दोन बोकड फस्त

राजापूर येथे बिबट्याचा धुमाकूळ; दोन शेळ्या व दोन बोकड फस्त

राजापूर |वार्ताहर| Rajapur

संगमनेर तालुक्यातील राजापूर येथे भाऊसाहेब मार्तंड खतोडे यांच्या सर्वे नंबर 62 मधील घराजवळ असलेल्या गोठ्यात रात्री बिबट्याने धुमाकूळ घातला असून 2 गाभण शेळ्या व 2 बोकड फस्त केल्या आहेत.

वन खात्याच्यावतीने पंचनामा करण्यात आला असून यावेळी वनक्षेत्रपाल एस. एस. माळी, वनपाल एस. बी. ढवळे, वनरक्षक श्रीमती जे. ए. पवळे, वॉचमन श्री. गोरडे उपस्थित होते. परिसरात बिबटे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. शेतकर्‍यांना शेतात काम करत असताना सातत्याने त्याचे दर्शन होत असते. संध्याकाळच्यावेळी शेतकरी दुधाला गावात येत असतात जाताना नेहमी धास्तावलेले असतात.

कारण कुठेही बिबट्या दिसून येतो.परिसरातील शेतकरी हे पूर्णपणे भयभीत झाले असून परिसरात पिंजरा लावला जावा, अशी मागणी संगमनेर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन संतोष हासे, सरपंच शैला हासे, उपसरपंच बादशहा हासे, कामगार पोलीस पाटील गोकुळ खतोडे, भारत शेलकर, भानुदास सोनवणे, बाळासाहेब शिरोळे, पंढरीनाथ हासे, भाऊसाहेब जिजाबा हासे, खतोडे, रावसाहेब खतोडे, शांताराम खतोडे, रामनाथ खतोडे, सुदाम हसे, संदीप हसे, कैलास खतोडे, सत्यम खतोडे यांच्यासह परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com