राजापूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

राजापूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

राजापूर |वार्ताहर| Rajapur

संगमनेर तालुक्यातील राजापूर येथे शनिवारी रात्री बिबट्याच्या बल्ल्यात शेळी ठार झाल्याची घटना घडली आहे.

गणपत गजाबा हासे यांच्या वस्तीवर शेळीवर बिबट्याने हल्ला केला. यावेळी आवाजाने घरातील माणसांनी आवजाच्या दिशेने धाव घेत बिबट्याच्या तावडीतून शेळीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने शेळीचा मृत्यू झाला.

परिसरामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातलेला आहे. परिसरात राहणारे शेतकरी यांना नेहमी अधून मधून डरकाळीचा आवाज त्याचबरोबर दर्शन सुद्धा होते. त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांना जनावरांचा चारा काढणे आणि दूध घालणे मुश्किल झाले आहे.

तरी वनविभागाने परिसरात पिंजरा लावावा व बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन संतोष हासे, विशाल हासे, नानासाहेब हासे, शांताराम सोनवणे, लक्ष्मण गोडसे, सुदाम गोडसे, पोपट हासे, विजय देशमुख, संजय देशमुख, सचिन नवले, रमेश लांडगे, अशोक देशमुख, शरद लांडगे, भारत लांडगे, विलास लांडगे, मधुकर शिरोळे, बाळासाहेब शिरोळे, अनिल शिरोळे, सुभाष हासे, अण्णासाहेब हासे, सूर्यभान देशमुख, विठ्ठल हासे यांनी मागणी केली आहे.

सदर घटनेचा पंचनामा वनविभागाचे श्रीमती ढवळे, श्री. गोर्डे यांनी केला आहे. नुकसान भरपाई मिळावी व पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com