रांजणखोल येथे महिलेस लाथाबुक्क्यांनी मारहाण

सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
रांजणखोल येथे महिलेस लाथाबुक्क्यांनी मारहाण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

राहाता तालुक्यातील रांजणखोल येथे एका 32 वर्षीय महिलेस शिवीगाळ करून व लाथाबुक्क्यांनी व लाकङी सदृश वस्तूने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. 20 जून रोजी सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान घराशेजारी राहणारा आबासाहेब ढोकचौळे याने दारू पिऊन येऊन काही कारण नसताना माझी पत्नी व मला शिवीगाळ केली. त्यावेळी माझी पत्नी व मी त्यांना शिवीगाळ करू नका, म्हणून सांगितले. त्यानंतर वाद होऊ नये म्हणून मी गावात निघून गेलो व त्यानंतर थोड्यावेळाने घरी भांङणे झाली असल्याचे फोनवरून समजले. मी घरी आलो असता आबासाहेब ढोकचौळे व गणेश ढोकचौळे मला म्हणाला की, तुझ्या घरासमोरील गटार माझ्या हद्दीत आहे, ती जागा तुम्ही वापरू नका, तसेच आम्ही खुप जणांना गावाच्या बाहेर काढले आहे तुम्हालाही काढू, अशी धमकी दिली.

यावेळी त्यांनी माझी पत्नी, आई, वडिलांना शिवीगाळ केली. शिवीगाळ का करता, असे विचारल्यावर माझी पत्नी व मला 6 जणांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली व हातातील लाकडी सदृश वस्तूने माझ्या पत्नीच्या पायावर व पोटात मारले व माझ्या 80 वर्षीय आजीस शिवीगाळ केली. त्यावेळी माझ्या वडिलांच्या डोळ्याखाली मार लागला.

यावेळी आबासाहेब लिंबाजी ढोकचौळे, गणेश आबासाहेब ढोकचौळे, महेश दत्तात्रय ढोकचौळे, रोहित दत्तात्रय ढोकचौळे, बाबासाहेब हरिचंद्र ढोकचौळे, लिला आबासाहेब ढोकचौळे सर्व रा. रांजणखोल यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

याप्रकरणी निलेश विजय जाधव यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजि. नं. 395/2021 प्रमाणे आबासाहेब लिंबाजी ढोकचौळे, गणेश आबासाहेब ढोकचौळे, महेश दत्तात्रय ढोकचौळे, रोहित दत्तात्रय ढोकचौळे, बाबासाहेब हरिचंद्र ढोकचौळे, लिला आबासाहेब ढोकचौळे यांचेविरुध्द भादंवि कलम 143, 147, 149, 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक साईनाथ करत आहेत.

दरम्यान, या मारहाणीचा प्रकार सीसीटिव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाला. त्यामुळे परिस्थिती पोलिसांसमोर आली. पोलीस निरीक्षक सानप यांच्या सुचनेनुसार श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस रघुवीर कारखिले, श्री. राशिनकर, श्री. शेलार यांनी घटनास्थळी येऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com