रांजणखोल परिसरात बिबट्याची दहशत

मेंढ्या, बोकड्यासह व कुत्र्यांचा फडशा पाडला
File Photo
File Photo

रांजणखोल |वार्ताहर| Rajankhol

रांजणखोल परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे. मागील 6 महिन्यांपासून वारंवार बिबट्या दिसूनही वनविभागाने राहाता तालुक्यातील रांजणखोल परिसरात सुरक्षेच्या उपाययोजना केल्या नाही. मागील सहा महिन्यापासून रांजणखोल परिसरात बिबट्याने शेळ्या मेंढ्या, बोकड व कुत्र्याचा फडशा पाडला आहे.

माजी उपसरपंच बाळासाहेब ढोकचौळे यांच्या वस्तीवर रस्तेच्या कडेला दुचाकीस्वारांना मंळवारी रात्री 9 वाजता बिबट्याने दर्शन दिले. पगारे हे दुचाकी वरुन रांजणखोल-गांधीवाडी रस्त्यावरून जात असताना बिबट्या अचानक गाडीसमोरून पळाल्याने त्यांची दमछाक झाली. या घटनेनंतर परिसरात प्रचंड दहशत पसरली असून बिबट्याला पकडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने हालचाल केली नसल्याने लोक भयभीत झाले आहेत.

या परिसरात पाणी व सुरक्षित जागा असल्यामुळे बिबट्याने रांजणखोल-गांधीवाडी रस्त्यावर असलेल्या शेतामध्ये वास्तव्य आहे. बिबट्याने आतापर्यंत शेळ्या, बोकड, कुत्र्यांचा फडशा पाडला आहे.परिसरातील कुत्र्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे या भागात बिबट्यांची संख्या नेमकी किती असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. बिबट्याची दहशत असल्याने रस्त्यावरची वर्दळ कमी झाली आहे

आतापर्यंत सायंकाळी नजरेस पडणार्‍या या बिबट्याने अनेकांना दिवसाही दर्शन दिल्याने येथील ग्रामस्थ भयभीत झाले असून वनविभागाने तातडीने परिसरात पाहणी करून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तातडीने मोहीम हाती घेवून पिंजरा लावावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सागर ढोकचौळे, रावसाहेब ढोकचौळे, नानासाहेब ढोकचौळे, श्रीकांत ढोकचौळे, राम पवार,अविनाश ढोकचौळे, हरी ढोकचौळे, अविनाश लबडे आदि ग्रामस्थांनी केली आहे.

रांजणखोल परिसरात बिबट्याचे वास्तव्य कायम दिसत आहे. रांजणखोल-खंडाळा,गांधीवाडी रस्त्येच्या कडेला शेती असून तेथे बिबट्याचा वावर आहे. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांनी योग्य ती दक्षता घ्यावी. वनअधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती देवुन बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी करणार आहे.

- कृष्णा अभंग, पोलीस पाटील

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com