रांजणगाव देशमुख येथे चोरी

दिड लाखांचा ऐवज लंपास
रांजणगाव देशमुख येथे चोरी

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh

कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील काथे वस्तीवर रहाणारे रावसाहेब काशिनाथ काथे यांच्या घराचे बाहेरुन लावलेले कुलुप तोडुन घरातील लोखंडी पेटी जवळील उसाच्या शेतात नेऊन ती फोडुन त्यात असलेले सव्वादोन तोळेचे दागीने तसेच रोख पाच हजार रुपये तसेच त्या खोलीत झोपलेल्या मुलाचा मोबाईल अशी सुमारे दिड लाखाची चोरी झाली आहे.

रांजणगाव देशमुख येथे चोरी
चास कामरगाव घाटात लष्कराची गाडी पलटली

सोमवारी रात्री झालेल्या या चोरीत सोने, रोख रक्कम व मोबाईल अशी दिड लाख रुपयाची चोरी झाली आहे. याच रात्री अंजनापुर येथील दत्तात्रय रामनाथ गव्हाणे यांचेकडेही चोरी झाली आहे. रांजणगाव देशमुख येथील काथे वस्तीवर रहाणारे रावसाहेब काशिनाथ काथे यांच्या घराचे बाहेरुन लावलेले कुलुप तोडुन घरातील लोखंडी पेटी जवळील उसाच्या शेतात नेऊन ती फोडुन त्यात असलेले सव्वादोन तोळेचे दागीने तसेच रोख पाच हजार रुपये तसेच त्या खोलीत झोपलेल्या मुलाचा मोबाईल अशी सुमारे दिड लाखाची चोरी झाली आहे.

रांजणगाव देशमुख येथे चोरी
मतिमंद मुलीवर अत्याचार, आरोपी गजाआड

घरात चोरट्यांनी सर्व उचकापाचक करत केली होती. अंजनापुर येथील दत्तात्रय रामनाथ गव्हाणे यांच्याही घराचा कडी कोंडा तोडुन आत प्रवेश करत कपाटाची उपकापाचक सुरु असतांना दत्तात्रय यांच्या पत्नीस जाग आली आवाज केल्याने चोरटे त्या ठिकाणाहुन गायब झाले. दोन्ही ठिकाणी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला आहे.

रांजणगाव देशमुख येथे चोरी
मानोरीत बहीण-भावाला कुर्‍हाडीच्या तुंब्याने मारहाण

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com