रांजणगाव देशमुख परिसरातील ओढे नाले तुडूंब

शेतकर्‍यांच्या उभ्या पिकातुन वाहते पाणी
रांजणगाव देशमुख परिसरातील ओढे नाले तुडूंब

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh

कोपरगाव तालुक्यातील (Kopargav Taluka) रांजणगाव देशमुख (Rajangav Deshmukh) परिसरात पाच दिवसापुर्वी जोराचा पाउस (Rain) झाला. या पावसामुळे सखल भाग आहे अशा ठिकाणी पिकात पाणी (Crops Water) साचलेले आहे. पिके (Crops) उपळण्याची परस्थिती निर्माण झाल्याने शेतकर्‍यांचे मोठ्या नुकसान झाले आहे. हमखास दोन पैसे मिळणारी खरीपाची पिके (Kharif Crops) सखल भागात पाण्याखाली गेली आहेत.

रांजणगाव देशमुख परिसरातील ओढे नाले तुडूंब
या तालुक्यात घोणस अळीचा मोठा प्रादुर्भाव

पंचवीस दिवसाच्या विश्रांतीनंतर एकदम जोराचा पाऊस रांजणगाव देशमुख (Rajangav Deshmukh) व पोहेगाव (Pohegav) परीसरात झाला. या पावसाची शेतकर्‍यांना नितांत गरज होती. यातुन अनेक खरीपाची पिके (Kharif Crops) वाचली आहेत तरीही जादा पावसामुळे काही शेतकर्‍यांची विशेषता सोयाबिनची पिकातुन (Soybean Crops) पाणी वाहत आहे. त्यामुळे सोयाबिनच्या (Soybean) उत्पनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

रांजणगाव देशमुख परिसरातील ओढे नाले तुडूंब
गोठ्याजवळील विहीर ढासळली पशुधन बालंबाल बचावले

गेल्या पंधरा वर्षात या गावांना असा पाऊस झालेला नाही, एवढा मोठा पाऊस या परीसरातील गावांना झाला. सातत्याने दुष्काळाची झळा सोसाणारा हा परीसर आहे. या वर्षी सुरुवातीपासुनच निसर्ग या परिसरावर मेहरबान झाला आहे. या भागात मध्यंतरी सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे काही परीसराची पेरणीही उशिरा झाली. परीसरातील केटीवेअर भरले आहेत. ओढे नाले खळखळुन वाहते झाले आहेत.

रांजणगाव देशमुख परिसरातील ओढे नाले तुडूंब
पाकिस्तानला कांदा व टोमॅटोची निर्यात त्वरित सुरू करा

काही पाझर तलाव भरले आहेत तर काहीमध्ये पाण्याची आवक चांगल्याप्रकारे सुरु आहे. सोयाबिनची सर्वाधिक पेरणी या परिसरात आहे. सोयाबीन, मका, बाजरी, कडवळ, भुईमग ह्या पिकांची पेरणी शेतकर्‍यांनी केलेली आहे. मात्र अतिवृष्टीमुळे हाती आलेला घास हिरावतो की काय परस्थिती सध्या या परीसरात निर्माण झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com