
रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव परिसरातील रांजणगाव देशमुख येथे ग्रामपंचायतीसाठी 86.17 टक्के, बहादरपूर येथे 94 टक्के, बहादराबाद येथे 92.82 टक्के, शहापूर येथे 88.79 टक्के व वेस सोयगाव येथे 85,26 टक्के मतदान झाले आहे. सर्वत्र शांततेत मतदान झाले आहे.
रांजणगाव देशमुख येथे वॉर्ड क्रमांक 1 मध्ये 769 पैकी 667, वॉर्ड क्रमांक 2 मध्ये 1050 पैकी 895, वॉर्ड क्रमांक 3 मध्ये 457 पैकी 407, वॉर्ड क्रमांक 4 मध्ये 964 पैकी 810, मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बहादरपूरमध्ये वॉर्ड क्रमांक 1 मध्ये 631 पैकी 595, वॉर्ड क्रमांक 2 मध्ये 689 पैकी 649, वॉर्ड क्रमांक 3 मध्ये 444 पैकी 406 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
वेस-सोयगाव येथे वॉर्ड क्रमांक 1 मध्ये 702 पैकी 594, वॉर्ड क्रमांक 2 मध्ये 525 पैकी 444, वॉर्ड क्रमांक 3 मध्ये 666 पैकी 576 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
शहापुर येथे वॉर्ड क्रमांक 1 मध्ये 388 पैकी 353, वॉर्ड क्रमांक 2 मध्ये 302 पैकी 270, वॉर्ड क्रमांक 3 मध्ये 354 पैकी 304 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बहादराबाद येथे वार्ड क्रमांक 1 मध्ये 397 पैकी 366, वॉर्ड क्रमांक 2 मध्ये 229 पैकी 215, वॉर्ड क्रमांक 3 मध्ये 280 पैकी 260 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. सरपंच पदाची निवडणूक थेट असल्याने सर्वत्र निवडणुकांमध्ये रंगत आली होती. मंगळवारी निकालानंतरच कोण बाजी मारेल हे कळणार आहे.तोपर्यंत आज सोमवारी सर्वांचीच आकडेमोड सुरू राहणार आहे हे मात्र नक्की.