पावसाळ्या पूर्वी 16 लाख गायी, म्हशीच्या लसीकरणाचे आव्हान !

पशूसंवर्धन विभाग : अंत्रविषार, घटसर्प आणि फर्‍या रोग प्रतिबंधात्मक लसी उपलब्ध
पावसाळ्या पूर्वी 16 लाख गायी,
म्हशीच्या लसीकरणाचे आव्हान !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विस्तार आणि आकाराने मोठा असणार्‍या नगर जिल्ह्यातील पूशधनाची संख्याही मोठी आहे. राज्यात दुध व्यवसायात अग्रेस असल्याने जिल्ह्यात मोठ्या संख्याने गायी, म्हशी आणि शेळ्या-मेंढ्या आहेत. पावसाळ्यात या पशूधनला विविध आजार होण्याची शक्यता असते. यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यातील 16 लाख गायी आणि म्हशींचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद पशूसंवर्धन विभागाच्यावतीने देण्यात आली.

जिल्ह्यातील पशूधनाची निगा ठेवण्यासाठी आणि त्यांना वेळीच शासकीय दरात उपचार देण्यासाठी जिल्हा परिषदेचे 216 पशू दवाखाने आहेत. त्या ठिकाण पशूधनावर शासकीय अथवा मोफत उपचार करण्यात येतात. यासह जिल्ह्यातील शेळ्या मेंंढ्यांची संख्या ही 14 लाख आहे. त्यांच्यावर देखील उपचार करण्याची जबाबदारी ही जिल्हा परिषद पशूसंवर्धन विभागावर आहे. या पशूधनाला पावसाळ्यात कोणताही आजार होेवू नयेत, साथजन्य आजाराला हे जनावरे बळी पडू नयेत, यासाठी उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व जनावरांचे लसीकरण करण्यात येते.

जनावरांच्या लसीकरणासाठी आतापर्यंत पशूसंवर्धन विभागाला 2 लाख 24 हजार अंत्रविषार रोग प्रतिबंधात्मक लसीचे डोस प्राप्त झालेले आहेत. यासह घटसर्प प्रतिबंधात्मक लसीचे 3 लाख 20 हजार डोस आले असून फर्‍या रोग प प्रतिबंधात्मक लसीचे 5 लाख 50 हजार डोस प्राप्त झालेले आहेत. आलेल्या लसींचे तालुकानिहाय वाटप सुरू झाले असून अनेक ठिकाणी लसीकरण मोहिम सुरू झालेली आहे. पावसाळ्यात पशूधनाला घटसर्प आणि फर्‍या तर शेळ्या आणि मेंढ्यांना अंत्रविषार रोगाचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता असते. यासाठी जिल्हा परिषद पशूसंवर्धन विभागाने पावसाळ्या पूर्वी जिल्ह्यातील पशूधनाचे लसीकरण उरकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शेतकर्‍यांनी आपल्या पशूधनाला लसीकरणासाठी जिल्हा परिषदेच्या पशू दवाखान्यांत घेवून जावे असे आवाहन पशूसंवर्धन विभागाने केलेले आहे.

तालुकानिहाय गायी आणि कंसात म्हशी

अकोले 86 हजार 390 (13 हजार 354), जामखेड 58 हजार 891 (16 हजार 559), कर्जत 1 लाख 15 हजार 559 (12 हजार 398), कोपरगाव 66 हजार 84 (3 हजार 908), नगर 1 लाख हजार5 (40 हजार 545), नेवासा 1 लाख 22 हजार 562 (28 हजार 648), पाथर्डी 82 हजार 60 (26 हजार 438), राहाता 86 हजार 390 (75 हजार 506), राहुरी 1 लाख 34 हजार 596 (5 हजार 392), संगमनेर 1 लाख 76 हजार 558 (2 हजार 139), शेवगाव 70 हजार 687 (21 हजार 199), श्रीगाेंंदा 1 लाख 5 हजार 551 (25 हजार 942), श्रीरामपूर 63 हजार 75 (7 हजार 166).

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com