9 ऑक्टोबरपासून राज्यात पाऊस थांबणार - पंजाबराव डख

डख व डॉ. अमोल चिंधे यांना दिघी येथे सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान
9 ऑक्टोबरपासून राज्यात पाऊस थांबणार - पंजाबराव डख

सलाबतपूर |वार्ताहर| Salabatpur

9 ऑक्टोबरपासून राज्यातील पाऊस थांबणार असून शेतकर्‍यांच्या हाती खरीप पिके येतील, असा दावा प्रसिद्ध हवामान अभ्यास पंजाबराव डख यांनी केला.

नेवासा तालुक्यातील दिघी येथे ग्रामपंचायतीच्यावतीने पंजाबराव डख तसेच उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सलाबतपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. अमोल चिंधे यांना नुकताच सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुळा कारखान्याचे उपाध्यक्ष कडूबाळ कर्डिले होते. यावेळी व्यासपीठांवर जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब शेळके, पंचायत समिती सभापती रावसाहेब कांगुणे, गणेश ढोकणे, कृषी अधिकारी मनोज सूर्यवंशी, निवृत्ती भागवत, लक्ष्मण सुडके, नानासाहेब बांदल, बबनराव नागोडे, रुस्तुम नवले, अर्जुन नवले, पांडुरंग काळे, सरपंच दीपक मोरे, उपसरपंच सचिन नागोडे उपस्थित होते.

यावेळी पंजाबराव डख म्हणाले, शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. देशात ऐंशी टक्के लोक शेती करतात. मात्र नैसर्गिक अपत्तीचा फटका फक्त शेतकर्‍यांना बसतो. करोना महामारीच्या काळात देश संकटात असताना शेतकर्‍यांनी कसलीही भीती न बाळगता मदतीची महत्त्वाची भूमिका बजावली म्हणून शेतकरी हाच खरा राजा आहे. त्यामुळे यापुढे फक्त शेतकर्‍यांच्या हितासाठीच काम करणार असल्याचे ते म्हणाले. अलीकडच्या काळात प्रचंड वृक्षतोड झाल्याने पृथ्वीचे तापमान वाढले असून यामुळे पावसाचे प्रमाण वाढत असून त्यामुळे अतिवृष्टी गारपीट, मुसळधार पावसाने शेतकर्‍यांना नुकसान सहन करावे लागणार आहे. त्यासाठी जास्तीतजास्त वृक्षलागवड करून पर्यावरण समतोल राखल्यास भविष्यात शेतकर्‍यांना चांगले दिवस येतील असे मत त्यांनी व्यक्त केले. तर तरुणांनी वाढदिवस साजरे करताना एक झाड लावण्याचा संकल्प करण्याचा सल्ला दिला.

अवकाळी व मान्सूनचा पाऊस कधी पडतो . याचे संकेत काय असतात याबाबत उपस्थितांना सोप्या भाषेत समजावून सांगितले .

यावेळी करोना योध्दे म्हणून काम केलेले अलका वाघमारे, कविता बर्वे, ग्रामसेवक सुरेश पुरी, अशोक आढागळे, दत्ता काळे तसेस यज्ञेश नागोडे, ॠषीकेश झगरे यांचा सन्मान करण्यात आला. प्रास्तविक संजय नागोडे यांनी केले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य मयुर नागोडे, पोपट नागोडे, संभाजी बर्वे, भाऊराव ब्राम्हणे, बाबासाहेब नागोडे, नंदु भक्त, दिगंबर बर्वे, भाऊसाहेब नागोडे, अशोक गवळी, सर्जेराव गवळी, ज्ञानेश्वर झगरे उपस्थित होते . सुत्रसंचालन रेवणनाथ पवार यांनी केले तर आभार उपसरपंच सचिन नागोडे यांनी मानले.

शेतकरी हा खरा राजा; त्याच्यासाठीच काम करणार

यावेळी पंजाबराव डख म्हणाले, शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. देशात ऐंशी टक्के लोक शेती करतात. मात्र नैसर्गिक आपत्तीचा फटका फक्त शेतकर्‍यांना् बसतो. करोना महामारीच्या काळात देश संकटात असताना शेतकर्‍यांनी कसलीही भीती न बाळगता मदतीची महत्वाची भूमिका बजावली म्हणून शेतकरी हाच खरा राजा आहे. त्यामुळे यापुढे फक्त शेतकर्‍यांच्या हितासाठीच काम करणार आहे.

Related Stories

No stories found.