ऐन पावसाळ्यात 85 गावातील पाणी दुषित

आरोग्य विभागाच्या ग्रामपंचायतींना नोटीस
ऐन पावसाळ्यात 85 गावातील पाणी दुषित

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणी योजना उभ्या करून शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. मात्र, दरवर्षी पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित असल्याचेच समोर येत आहे. ऐन पावसाळ्यात जूनमध्ये आरोग्य विभागाने जिल्ह्यातील 2 हजार 459 पाणी नमुने तपासले. त्यापैकी 85 गावांतील 132 नमुने दूषित आढळले आहेत.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून नियमतिपणे पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली जाते. तपासणीत पाणी दूषित असल्याचे आढळून आल्यास संबंधित ग्रामपंचायतींना पाणी शुद्धीकरणाबाबत, तसेच इतर उपाययोजना करण्याच्या नोटीस दिल्या जातात. तरी जिल्ह्यातील सर्व गावांना शुद्ध पाणीपुरवठा करणे शक्य होत नसल्याचे दिसून येत आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जून महिन्यांत जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांतील 2 हजार 459 पाणी नमुने तपासण्यात आले. यापैकी 132 नमुने दूषित आढळले आहेत. या ठिकाणी पाणी शुद्धीकरणासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. पावसाळ्यात दूषित पाण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे साथरोगांचा फैलाव होण्याची शक्यताही वाढते. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अशा गावांतील जलस्त्रोताचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासते. वरिष्ठ भूवैज्ञानिक अधिकार्‍यांकडून जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत हे नमुने तपासले जातात.

‘या’ गावांचे पाणी दूषित

अकोले- निळवंडे, मेहंदुरी, उडदावणे, घाटघर, कोळटेंभे, केळुंगण. नेवासा- गिडेगाव, पाचेगाव, म्हसले, गोंडेगाव, मुकिंदपूर. कोपरगाव- शिंगणापूर, मढी, शहापूर, खिर्डी गणेश, कोळगाव थडी, कोळपेवाडी. जामखेड- तरडगाव, नगर- इमामपूर, राळेगण, शिराढोण, दहिगाव, साकत, नागरदेवळे, बुर्‍हाणनगर, पांगरमल, उदरमल, पिंपळगाव माळवी, उक्कडगाव, कर्जत- जळकेवाडी, पारनेर- ढवळपुरी, दैठणे गुंजाळ, सारोळा अडवाई, अस्तगाव, गवळी, सुपा, लोणी, मुंगशी, कान्हूरपठार, दैठणे गुंजाळ, काळकुप, भाळवणी, भाडगाव, गाडीलगाव, राळेगणथेरपाळ, गुणोरे, ढोकी, जामगाव, वडणेर बु., म्हस्केवाडी, जाधववाडी, नारायणगव्हाण, वाडेगव्हाण, टाकळी ढोकेश्वर, म्हसोबा झाप, देसवडे, सिद्धेश्वरवाडी, राहाता- दहिगाव कोर्‍हाळे, अडगाव, राहुरी- चेडगाव, कुक्कडवेढे, अंमळनेर, ब्राम्हणगाव भांड, डिंग्रस, तांभेरे, सोनगाव, ताहराबाद, चिखलठाण, वरवंडी, वाघापूर, श्रीगोंदा- कोरेगाव, कोळगाव, धारगाव, ढोरजा, सुरगाव, घुटेगाडी, मुंगुसगाव,मातापूर, कारेगाव, मालुंजे बु यांचा पाणी नमुदे दूषित असलेल्या गावांत समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com