नगर, राहात्यात धुव्वाँधार

29 महसूल मंडळात दमदार पाऊस : नगरमध्ये सीना नदीला पूर
नगर, राहात्यात धुव्वाँधार

अहमदनगर (प्रतिनिधी)

नगर शहर आणि तालुक्यासह राहात्यमध्ये गुरूवारी रात्री धुव्वाँधार पाऊस बरसला. नगरमध्ये सावेडी महसूल मंडलात सलग दुसर्‍या दिवशी 96 मि.मी तर राहाता शहरात 88 मि.मी. पावसाची नोंद झाली.

नगर शहर आणि परिसरात झालेल्या पावसामुळे शुक्रवारी सकाळी सीना नदीला पूर आला. यामुळे कल्याण रोड भागातील नागरिकांचा नगर शहराशी संपर्क तुटला. दरम्यान, गुरूवारी रात्री जिल्ह्यात 29 महसूल मंडलात 30 मि.मी. पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील एकूण पावसाची सरासरी ही 61.3 टक्के झाली आहे.

गुरूवारी रात्री अचानक नगर शहर आणि जिल्ह्याच्या अन्य भागात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. सुरूवातीला पावसाचा जोर कमी होता. मात्र, त्यात वाढ होत गेली. विजांचा कडकडाटांसह पाऊस कोसळत असतांना विज गायब झाली. नगर शहरातील सखल भागातील अनेक वसाहती आणि घरात पाणी शिरले. शुक्रवारी सकाळी दिवस उजेडताच सीना नदीचे रौद्र रुप नगरकरांनी पाहिले.

सीनेला यंदाच्या पावसाळ्या पहिल्यांदा पूर आला. या पूराच्या पाण्याचा वेढा नदी काठावरील वसाहती, दुकाने, रहिवासी संकूलांना बसला. शुक्रवारी सकाळी सहाच्या दरम्यान पावसाने उघडीप दिली. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास पुन्हा नगर शहर आणि परिसारात धुव्वाधार पाऊस कोसळला.

नालेगाव 33, सावेडी 96, कापूरवाडी 49, केडगाव 49, नागापूर 65, जेऊर 47.5, रुईछत्तीशी 33, भाळवणी 49, निघोज 32, मांडवगण 31, कर्जत 49, कोंभळी 64, मिरजगाव 37, माहीजळगाव 37, आरणगाव 38, खर्डा 40, भातकुडगाव 52, सलाबतपूर 42.5, कुकाणा 35, राहुरी 37, टाकळीमियॉ 38, ब्राम्हणी 30, वांबोरी 30.5, दहिगाव 30, पोहेगाव 64.8, बेलापूर 33, राहाता 88, शिर्डी 30, लोणी 30.3, बेलापूर 33 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com