अलर्ट...हजेरी मात्र रिमझिम

अलर्ट...हजेरी मात्र रिमझिम

अहमदनगर | ahmednagar -

हवामान विभागाने ( Meteorological Department ) मध्य महाराष्ट्रात 4 दिवसांच्या मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मात्र सोमवार रात्रीपासून नगर शहरासह परिसरात पावसाची रिमझिम हजेरी आहे.

राज्यातील विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मंगळवारपासून पुढील चार दिवस पावसाची हजेरी राहील, असा अंदाज आहे. सोमवारी रात्रीपासून नगरसह जिल्ह्यातील काही भागात पाऊस सुरू झाला. पावसाची हजेरी मुसळधार असेल, असे वातावरण होते. मात्र रिमझिम हजेरी आहे. मंगळवार सकाळपासून शहरात पावसाळी वातावरण आहे. गारवाही वाढला आहे. आठवड्यापूर्वी नगर जिल्ह्यातील काही भागात मुसळधार तर काही तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. पाथर्डी व शेवगाव Pathardi and Shevagav तालुक्यात मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे प्रशासन हवामान विभागाच्या इशार्‍यानंतर सावध आहे.

राज्यात अनेक जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. कोकणात सर्वदूर पाऊस सुरू आहे. शेजारी बीड जिल्ह्यातही पावसाने हजरी लावल्याने नदी-नाले तुडूंब आहेत. अंबाजोगाई महामार्ग पुराच्या पाण्यामुळे काहीकाळ ठप्प झाला होता. मराठवाड्यातील परभणी, औरंगाबाद, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com