पावसाने सोयाबीनचे नुकसान; शेतकर्‍याने गंजी पेटविली

पावसाने सोयाबीनचे नुकसान; शेतकर्‍याने 
गंजी पेटविली

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

परतीच्या पावसाने सोयाबीनचे नुकसान झाले. वरिष्ठांना फोन करुनही दखल न घेतल्याने तालुक्यातील मातापूर येथील प्रगतिशील शेतकरी अजिंक्य उंडे यांनी त्यांच्या शेतातील राहिलेली सोयाबीनची गंजी पेटवून देत निषेध नोंदविला. परतीच्या पावसाने सर्व सोयाबीन खराब झाले.

त्यामुळे सोयाबीन काळे पडले. मशागतीचा खर्चही निघणार नसल्याने उंडे यांनी सोयाबीनची गंजी पेटवून दिली. शासनाने लवकर ओला दुष्काळ जाहीर न केल्यास लोकशाही मार्गाने उपोषण करणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी महेश लासुरे, बाळासाहेब शिरोळे, दगडू उंडे, विजय गायके, अक्षय उंडे, भागिनाथ शिरोळे, विनोद उंडे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com