पावसामुळे पाणीपुरवठा तलावातील पिचिंग ढासळली

पावसामुळे पाणीपुरवठा तलावातील पिचिंग ढासळली

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

जागतिक बँकेच्या सहकार्याने जलस्वराज टप्पा दोन अंतर्गत 17 कोटी रुपये खर्चाच्या पुणतांबा-रास्तापूर गावाच्या संयुक्त पाणी पुरवठा योजनेचे (water supply scheme) काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. पाणीपुरवठा योजनेच्या साठवण तलावाच्या पिंचिंगचे काम दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे ढासळले (pitching in the water supply pond collapsed) आहे.

त्यामुळे या कामासह पाणीपुरवठा योजनेच्या संपूर्ण कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे. साठवण तलावाच्या (storage Pond) दक्षिण व पश्चिम बाजूला पिंचिंग खाली असून तळ बाजूला असलेले बिम सुद्धा वाकलेले आहेत. त्यामुळे कामासाठी वापरलेले साहित्य व कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाणीपुरवठा योजनेच्या कामावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग नाशिक (Maharashtra Jeevan Pradhikaran Regional Division Nashik) याचे नियंत्रण असून ठेकेदारामार्फत काम सध्या पूर्ण केले जात आहे.

पाणीपुरवठा योजनेवर देखरेख (Monitoring of water supply scheme) ठेवण्यासाठी महिला विकास समिती, ग्रामआरोग्य पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समिती, सामाजिक लेखा परीक्षण समितीसह तीन समित्या गठीत केलेल्या असून प्रत्येक समितीत अध्यक्ष, सचिव व सदस्य असून सर्वांची संख्या 44 आहे. त्यांच्या अधिकार्‍यांसमवेत बैठका घेतल्या जातात. तसेच कामाचा सातत्याने आढावा घेतला जातो. पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष सरपंच डॉ. धनंजय धनवटे आहेत.

त्यांचेही कामावर सातत्याने लक्ष असते, असे असताना साठवण तलावाच्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या पिंचिंगचे काम ढासळल्याबद्दल सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. डॉ. धनवटे (Dr. Dhanajay Dhanwate) यांनी तातडीने संबधित अधिकार्‍यांना बोलावून पाहणी केली व वस्तुस्थिती लक्षात आणून दिली आहे. कामाची दुरुस्ती करून देण्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले असले तरी पाणीपुरवठा योजनेशी निगडीत सर्वच कामाची गुणवत्ता नियत्रंण विभागामार्फत तपासणी करावी तसेच पुणतांबेकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या पाणीपुरवठा योजनेच्या झालेली कामे सध्या चालू असलेली कामे तसेच कामाच्या वर्कऑर्डर मधील तरतुदी, अंदाजपत्रीय खर्च (Estimated costs) यावर चर्चा करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने विशेष ग्रामसभेचे आयोजन करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com