नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार
सोनईत कौतुकी नदीला आलेला पूर

नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार

कौतुकी नदीला पूर, तांभेरे बंधारा भरला, हसनापुरात वीज कोसळली

अहमदनगर ( प्रतिनिधी) / Ahmednagar - उत्तर नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी, नेवासा आणि श्रीरामपूर तालुक्याच्या विविध भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. वातावरणातही गारवा निर्माण झाला आहे.

श्रीरामपू शहर व तालुक्यात रविवारी रात्री संततधार सुरू होती. सोमवारीही अधूनमधून सरी कोसळत होत्या. श्रीरामपूरात रविवारी झालेल्या पावसाची नोंद 49 मिमी झाली. वडाळ्यात 60, कारेगावात 60 मिमी पाऊस झाला.

राहुरी तालुक्यातील देवळाली (72 मिमी), सात्रळ, सोनगावात (32 मिमी), मुसळवाडी 90 मिमी पाऊस झाला. आंबी, अंमळनेर, केसापूर, दवणगाव, संक्रापूर, पिंपळगाव फुणगी, गंगापूर परिसरात पावसाचे दमदार आगमन झाले.

नगरमध्ये 53 मिमी पावसाची नोंद झाली आहे. संगमनेरात सोमवारी जोरदार पाऊस झाला. ओझर 50, आश्‍वी 43 मिमी पावसाची नोंद झाली. वडगावपानलाही पावसाने हजेरी लावली. अकोलेच्या काही भागात अधूनमधून सरी कोसळत होत्या. रविवारी झालेल्या पावसाची नोंद अकोलेत 23, निळवंडे 16, आढळा 22, कोतूळमध्ये 13 मिमी. पाऊस झाला.

रविवारी सोनई परिसरात सलग चार तास पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. सोनईत 103 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कौतुकी नदी व परीसरातील ओढ्यानाल्रास पूर आला होता.

सोनईत 103 मिलीमीटर, घोडेगाव रेथे 63, चांदा 90, वडाळाबहिरोबा-77, नेवासा 70, कुकाणा-43 तर सर्वांत कमी पाऊस सलाबतपूर येथे 15 मिलीमीटर नोंद झाली.

राहाता तालुक्यातही कमी अधिक पाऊस झाला. हसनापूर येथे वीज कोसळली. लोणीत 66, खंडाळा 84 मिमी पाऊस झाला.

दरम्यान, कोतूळ आणि भंडारदरा वार्ताहराने कळविले की, पाणलोटात पाऊस होत असलातरी त्याचा जोर नाही. केवळ अधूनमधून जोरदार सरी बरसत आहेत. जोरदार पाऊस नसल्याने भात लागवड रखडली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com