अहमदनगर (प्रतिनिधी) -

गुरूवार, शुक्रवार सलग दोन दिवस नगर शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. आज शुक्रवारी पहाटेपासूनच सुरू झालेली

पावसाची रिमझिम अकराच्या सुमारास थांबली. दुपारी बारा वाजेच्या सुमारास नगरकरांना काही काळ सूर्याचे दर्शन झाले. सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने सूर्य पुन्हा ढगाआड गेल्याचे दिसले.

काल गुरूवारी सकाळी आणि संध्याकाळी पावसाची बुरबुर झाली. आज शुक्रवारी पहाटपासूनच रिमझिप सुरू झाली. अवकाळी पावसाच्या हजेरीने मॉर्निंग वॉक करणार्या नगरकरांची धांदल उडाली. आकाशात ढग दाटून आल्याने सकाळचा सूर्य नगरकरांना दिसलाच नाही. अकरा वाजेपर्यंत रिमझिम सुरू होती. त्यानंतरही ढगाळ वातावरण कायम होते. दुपारी बारा वाजेच्या सुमारास काही वेळ नगरकरांना सूर्यदर्शन झाले. त्यानंतर सूर्य पुन्हा ढगाआड गेला.

अवकाळी पावसामुळे आंबा पिकाच्या मोहराला फटका बसणार आहे. तसेच ढगाळ हवामानामुळे किड व अळीचा प्राद्रुुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. दुपारनंतरही अधूनमधून पावसाचे शिडकारे सुरूच होते.

वर्हाडींची धांदल...

सध्या लग्नसराई जोरात सुरू आहे. लॉकडाऊनमुळे लांबलेल्या अनेक मंडळींचे विवाह आता पार पडत आहेत. अचानक पडलेल्या पावसामुळे ओपन लॉन्सवर होणार्या सोहळ्यांतील वर्हाडींची चांगलीच धांदल उडाली. वधू-वरांबरोबरच आवरून-सवरून आलेल्या या पाहुणे मंडळींच्या उत्साहावर पावसाने पाणी फेरले.