अतिरिक्त पावसाने पाचेगाव परिसरात प्रचंड नुकसान

भिजलेली कपाशी, सोयाबीन काळवंडली; उन्हाळ कांदा रोपे, बाजरी, चारापिके पाण्यात
अतिरिक्त पावसाने पाचेगाव परिसरात प्रचंड नुकसान

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) पाचेगावात (Pachegav) यंदाही पावसाने वार्षिक सरासरी ओलांडून शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांचे (Crops) अतोनात नुकसान केले.

सोयाबीन, कपाशी, बाजरी, मका, भुईमूग, तूर आदी पिके व उन्हाळ कांदा रोपांचे (Onion Crops) मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन मागील वर्षीची पुन्हा या भागात पुनरावृत्ती झाली आहे. जूनपासून आतापर्यंत जवळपास 800 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सरासरीच्या अतिरिक्त पाऊस (Rain) नोंदला गेला आहे.

या भागात तब्बल 32 इंच पावसाची नोंद करण्यात आली असून शेतजमिनी उपळून गेल्या आहेत. त्यामुळे खरिपातील (Kharip) काढणीला आलेल्या पिकाचे (Crops) मूळे कुजून पीक खराब झाले आहे. आजही अनेक शेतात पाणी साचलेले असून शेतं शेवाळलेली दिसत आहे. या आपत्तीने शेतकरी पुन्हा कोलमडून गेला असून सलग दुसर्‍या वर्षी पावसाने बळीराजाचा घास हिरावून नेला आहे.

परिसरातील शेतातील विहिरी (Well), कुपनलिका यातून पाणी बाहेर पडायला सुरुवात झाली असून त्यामुळे खरीप पिकाचेही (Kharip Crops) अतोनात नुकसान झाले आहे. ओढे, नाले अजूनही वाहत असल्याने परिसरातील पाणीपातळी आता नुकसानीची ठरू पाहत आहे.

गेल्या वर्षी पाचेगाव (Pachegav) परिसरात 958 मिलिमीटर पावसाची नोंद होऊन खरीप पिके (Kharip Crops) वाया गेली होती. त्या नुकसानीची शासनाकडून अजूनही भरपाई मिळालेली नाही. त्यात यंदा पुन्हा पावसाने तडाखा दिला असून शेतकरी पुर्णतः कोलमडला असल्याचे दिसत आहे. मागील ऑक्टोबर महिन्यात शासनाने शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन नुकसान पिकाचे पंचनामे करण्यात आली होती, त्या नुकसान पंचनामेचे पैसे आजून शेतकर्‍यांना मिळाले नाही. शेतकरी मागील पीक नुकसान (Crops Loss) भरपाईच्या पैशाची वाट पाहात आहे, तोच पुन्हा एकदा शेतकर्‍यांना वर अतिवृष्टी होऊन घात केल्याचे चित्र या भागात स्पष्ट दिसत आहे.

या भागात सतत पाऊस पडत होता, पण मागील सप्टेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात 23 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत म्हणजे तब्बल सहा दिवसात 158 मिली पावसाची नोंद होऊन त्यात सरासरी 6.5 इंच पाऊस पडला. म्हणजे सरासरी प्रति दिवसाला सव्वा इंच पाऊस नोंदला गेला. त्यात 28 तारेखला तब्बल 67 मिली प्रचंड पावसाची नोंद होऊन (पावणे तीन इंच)पाऊस एकच दिवसात पडला. त्यामुळे खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी व पीक विमा देखील लवकरात लवकर मंजूर करण्यात यावा अशी आग्रही मागणी पाचेगाव (Pachegav), कारवाडी येथील शेतकर्‍यांनी केली.

पीक विमा कंपनीचा टोल फ्री नंबर कायमच व्यस्त

पीक विमा कंपनीचा टोलफ्री क्रमांक कायमच व्यस्त असतो. फोन जरी लागला तरी फोन ऑपरेटर कंपनीच्या प्रतिनिधीला दिल्यानंतर तब्बल तीस मिनिटांनी फोन घेतला जातो, विमा तालुका प्रतिनिधींशीही संपर्क करण्यास अडचणी येत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला तक्रार कशी द्यावी हा मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे पीक नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या तक्रारी या ऑफलाईन पध्दतीने घ्याव्यात जेणेकरून सर्वसामान्य शेतकर्‍यांना आपल्या पीक नुकसान भरपाईची तक्रार देण्यास सोपे होईल, अशी आग्रही मागणी शेतकरी वर्ग करीत आहे.

Related Stories

No stories found.