पावसामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान

शासकीय मदत न मिळाल्याने बळीराजा हतबल
पावसामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान

पिंपरी निर्मळ |वार्ताहर|Pimpri Nirmal

राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ परिसरात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे.सोंगणीस आलेली खरिपाची पिके पाण्यात असल्याने शेतकर्‍यांचे प्रंचड नुकसान होत आहे. महिन्यापूर्वी शासनाने दिवाळीपूर्वी शासकीय मदत व पीकविमा शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग करण्याची घोषणा केली. मात्र, याबाबत कोणतीही हालचाल दिसत नसल्यामुळे आपदग्रस्त शेतकर्‍यांची दिवाळी अंधःकारमय होण्याची शक्यता असून राजा उदार झाला हाती भोपळा दिला अस म्हणण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.

राहाता तालुक्यात मागील महिनाभरापासून परतीच्या पावसाने कहर केला आहे. यामुळे शेतकर्‍यांचे प्रंचड नुकसान झाले आहे. पिंपरी निर्मळ परिसरात खरिपाची सोयाबीन, बाजरी, मका आदी पिके सोंगणीस सुरवात झाली आहे. तर काही शेतकर्‍यांनी सोयाबीन सोंगून आहेत.शासनाने पंचनामे करण्याचे आदेश देऊन दिवाळीपूर्वी शासकीय मदत व पीकविमा शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग करण्याची घोषणा केली होती. अद्यापही शासकीय अधिकारी पंचनाम्यांचा फार्स करत आहेत. तर विमा कंपनीचे प्रतिनिधी कागदी घोडे नाचविण्यात दंग आहेत.

पिंपरी निर्मळचे माजी सरपंच बाबासाहेब घोरपडे यांची सोयाबीन पाण्याने सडली. त्यांचे प्रचंड नुकसान झाले. वेळेत शासकीय मदत न मिळाल्याने आयुष्य संपविण्याची वेळ शेतकर्‍यांवर येऊ देऊ नका, अशी कैफीयत त्यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना दुरध्वनीवरून मांडली. त्यांनीही सविस्तर माहिती घेऊन जिल्हाधिकार्‍यांना सूचना करतो असे आश्वासन दिल्याची माहिती घोरपडे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com