एकाच पावसाने पिंपरी निर्मळ परिसरातील रस्त्यांची दैना

बांधकाम विभागाच्या गुणवत्तेचे पितळ उघडे
एकाच पावसाने पिंपरी निर्मळ परिसरातील रस्त्यांची दैना

पिंपरी निर्मळ (वार्ताहर)

राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ परिसरातील सर्वच रस्त्याचे पहिल्याच पावसात वाटोळे झाले असून बहुतांश रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असल्याने विभागाच्या निकृष्ठ कामाचे पितळ उघडे पडले आहे.

पिंपरी निर्मंळ परिसरातील लोणी रोड, आडगाव, राजुरी, गोगलगाव, अस्तगाव, मोरवाडी असे महत्वपूर्ण रस्ते आहेत. गेल्या काही दिवसात परिसरात अतिवृष्टी झाली आहे. मात्र या पावसामुळे परिसरातील नगर-मनमाड़ हायवेसह बाह्यवळण रस्त्या व सर्वच रस्त्याचे प्रचंड नुकसान झाले आहे.

काही दिवसापर्यंत चांगल्या स्थितीत असणार्‍या या रस्त्याचे एकाच पावसाने वाटोळे झाले आहे. पिंपरी निर्मळ गावाला जोडणार्‍या या रस्त्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कोट्यावधीचा खर्च केला आहे. अगदी पिंपरी निर्मंळ-आडगाव रस्त्यावर तर भर पावसात डांबर टाकले मात्र दुसर्‍याच दिवशी हा रस्ता पावसाने वाहुन गेला आहे.

पिंपरी निर्मंळ परिसरात बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोट्यावधीची कामे झाली. मात्र गुणवत्ता नसल्याने एकाच पावसात ही सर्व रस्ते वाहुन गेली असल्याने शासकीय निधीचे प्रंचड नुकसान झाले असून ग्रामस्थ हैराण झाले आहे. संबंधित रस्त्यांची तातडीने दुरूस्ती व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com