संततधार पाऊस; वळण परिसरातील पिके धोक्यात

संततधार पाऊस; वळण परिसरातील पिके धोक्यात

वळण |वार्ताहर| Valan

राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील वळण परिसरात सतत पडणार्‍या पावसामुळे कपाशीचे धोक्यात आले असून बळीराजा या आस्मानी संकटात सापडला आहे.

शेतकर्‍यांनी चालू वर्षी मोठ्या प्रमाणावर कपाशीचे लागवड केली आहे. कपाशीची लागवड केल्यापासून चांगल्यापैकी पाऊस झाले. पण पावसामुळे कपाशीचे खालचे बोंडे काळी पडून सडायला लागले आहेत. सोयाबीन पण पावसामुळे उफळून चालली आहे. या पावसाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून या पिकांचे सरसकट पंचनामे करण्यात यावे तसेच ऑनलाईन पीक पाहणी करण्यासाठी काही शेतकर्‍याकडे मोबाईल नाही ज्यांच्याकडे आहे त्यांना चारपाच तास शेतावर जाऊन ईपीक पाहणी करावे लागते.

पण मात्र ती शेतकर्‍यांना करता येत नाही. त्यासाठी राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील तलाठ्यांनी प्रत्येक शेतकर्‍याच्या बांधावर जाऊन ही पीक पाणी करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे ऋषिकेश आढाव, बबलू काळे, धनंजय आढाव, कारभारी खुळे, जालिंदर काळे, राधेश्याम लहारे, यशपाल पवार, डॉ. पुंड, मुकुंदा काळे, अशोकराव कुलट, आदी शेतकर्‍यांनी केली आहे.

शेतकर्‍यांनी कपाशीच्या खते, सर्व मशागती व फवारणी वेळेवर केली. पाऊस देखील चांगला पडला. गेल्या दोन महिन्यापासून भरपूर पडत असल्यामुळे कपाशीचे खालचे बोंडे काळी पडून सडायला लागले आहेत, असे वळण येथील शेतकरी बाबासाहेब खुळे यांनी सांगितले.

शेतकरी प्रकाश खुळे म्हणाले, सध्या शेतकर्‍यांना इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कपाशीचे भरपूर वाढ झाली आहे. शेतकर्‍यांनी मजुराकडून कपाशीचे शेंडे खुडण्यास सुरुवात केली आहे.

राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकर्‍यांनी कपाशी सोयाबीन घास इत्यादी पिके घेतले आहे. सोयाबीन देखील शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे पण गेल्या दोन महिन्यापासून ऊन पडत नसल्यामुळे सोयाबीन देखील उफळून चालली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे सरसकट पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी बाळासाहेब शिंदे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com