550 हेक्टरवरील पिकांना फटका

जून, जुलैमधील पावसामुळे नुकसान
550 हेक्टरवरील पिकांना फटका

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे पाच तालुक्यात शेती पिकांचे नुकसान झाले आहे. यात अकोले तालुक्यात सर्वाधिक 432 हेक्टरवरील पिकांना तडाखा बसला आहे. तर संगमनेर, श्रीगोंदा, शेवगाव आणि जामखेड तालुक्यात काही प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे.

यंदा सुरूवातीपासून वरूणराजा नगर जिल्ह्यावर मेहरबान होता. जून आणि जुलै महिन्यांत अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली. काही भागात ढगफुटी सदृष्य पाऊस झाला. प्रशासनाच्या आकडेवारीनूसार जिल्हा जून आणि जुलै महिन्यांत 114 टक्क्यांच्या सरासरीने 234 मिली मीटर पाऊस झालेला आहे.

जून महिन्यांत संगमनेर तालुक्यात 110 हेक्टर, श्रीगोंदा तालुक्यात 8.87 हेक्टर, शेवगाव तालुक्यात 5 हेक्टर आणि जामखेड तालुक्यात 2.93 हेक्टर शेती पिकांचे नुकसान झालेले आहे. तर अकोले तालुक्यात जुलै महिन्यांत 432.82 हेक्टरवर शेती पिकांचे नुकसान झालेले आहे. याबाबत अहवाल कृषी विभागाकडून जिल्हा प्रशासानाला सादर करण्यात आलेला आहे.

सोयाबीनला फटका ?

अनेक ठिकाणी सततच्या पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सोयाबिन पिकाला त्याचा फटका बसला आहेत. तसेच यलो मोजियाक रोगामुळ सोयाबीनला फळ लागत तक्रार शेतकर्‍यांकडून होतांना दिसत आहे. पेरणी, फवारणी, खुरपणी इतर मशागतीचा खर्चाने शेतकरी हैराण असताना परत दुसरं संकट या शेतकर्‍यांवर आलं आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com