पाऊस व गारपीट नुकसानीचे कोपरगावला 50.42 लाख - आमदार काळे

पाऊस व गारपीट नुकसानीचे कोपरगावला 50.42 लाख - आमदार काळे
आमदार आशुतोष काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

2021 मध्ये मार्च, एप्रिल, मे महिन्यात अवेळी झालेला पाऊस व झालेल्या गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी (Farmers should get compensation) यासाठी केलेल्या पाठ्पुराव्यातून कोपरगाव तालुक्यातील (Kopargav Taluka) नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना महसूल खात्याने (Revenue Department) 50.42 लाख रुपयांची मदत जाहीर केली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांनी दिली आहे.

तालुक्यात मार्च, एप्रिल, मे महिन्यात काही गावांमध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे तसेच काही ठिकाणी गारपीट झाल्यामुळे काढणीला आलेल्या गहू (Wheat), कांदा पिकांचे (Onion Crops) व फळबागांचे (Orchards) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यावेळी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी झालेल्या नुकसानीचे तातडीने अचूक पंचनामे करण्याच्या सूचना आ. काळे (MLA Ashutosh Kale) यांनी कृषी विभागाला (Department of Agriculture) दिल्या होत्या.

त्यानुसार कोपरगाव तालुक्यातील 10 गावांतील 999 शेतकर्‍यांना या अवकाळी पावसाचा व गारपिटीचा फटका बसून 358.96 हेक्टर क्षेत्राला फटका बसला होता. या नुकसानीची दखल घेऊन आ. आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांनी या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्यातून महसूल विभागाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना 50.42 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

निसर्गनिर्मित संकटापुढे आपण सर्वजण हतबल असतो. मात्र अशा संकटाचा ज्या घटकांना फटका बसतो त्यावेळी त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहणे गरजेचे असते.ज्या ज्यावेळी संकटे आली त्यावेळी नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरीकांना जास्तीत जास्त मदत कशी मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न केले आहेत.

- आमदार आशुतोष काळे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com