Rain Alert : नगरला आज आणि उद्या यलो अर्लट

पाऊस सक्रिय : शुक्रवारी नगरमध्ये पुन्हा पावसाची जोरदार बॅटिंग
Rain Alert : नगरला आज आणि उद्या यलो अर्लट

अहमदनगर | प्रतिनिधी

नगर जिल्ह्यात पाऊस चांगलाच सक्रिय झाला आहे. आज 30 सप्टेंबर व उद्या 1 ऑक्टोबरला जिल्ह्याला भारतीय हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळपासून नगर शहरात पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळ पाचपासून शहराच्या विविध भागात पावसाची जोरदार बॅटींग सुरू होती.

नगर शहर आणि जिल्ह्याच्या विविध भागात मागील आठवड्यात गणेशोत्सावाच्या दुसर्‍या दिवसापासून दमदार पावसाला सुरूवात झाली आहे. या पावसामुळे अनेक तालुक्यात सरासरी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. यामुळे बळीराजासह सामान्य नागरिक सुखावला आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी देखील नगर शहरात रात्री 9 च्या सुमारास पावसाने हजेरी लावली. यामुळे बाप्पांना निरोप देणार्‍या मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास नगर शहर आणि उपनगरात पावसाला सुरूवात झाली. आधी जोरदार पावसानंतर रात्री उशीरापर्यंत पावसाच्या जोरदार सरीवर सरी कोसळत होत्या.

Rain Alert : नगरला आज आणि उद्या यलो अर्लट
Crime News : पत्नीनेच केला पतीचा खून केला; भावाच्या मदतीने काढला काटा

दरम्यान, पुढील दोन दिवस पुन्हा जिल्ह्यात पावसाचा यलो अर्लट जारी करण्यात आला आहे. संभाव्य पावसाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे नागरीकांना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटात, वादळी वारे वाहत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासह राज्यातील सर्वच भागात पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागाच्यावतीने ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तर उर्वरित कोकणात जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मराठवड्यातील सर्वच जिल्ह्यांसोबत मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, पुणे, अहमदनगर जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com