आठ दिवस परतीचा पाऊस

नगर जिल्हा प्रशासन अलर्ट
आठ दिवस परतीचा पाऊस

पुणे (Pune)

पुढील आठ दिवस राज्यात मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाने राज्यभर हजेरी लावली होती. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे पिकांची मोठी हानी झाली. आता आठवडाभर राज्यात ही स्थिती कायम राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

मुंबई, पुणे, अहमदनगर आदी शहरासह राज्यातील विविध भागात दुपारनंतर अचानक ढगांची गर्दी होतेआणि विजांचा कडकडाट मुसळधार पावसाचे चित्र होते.

मान्सूनचा परतीचा प्रवास आणि बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा अधिक सक्रिय झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील आठवड्यात सोमवारनंतर पावसाने काहीशी विश्रांती घेण्याची शक्यता असून,

१४ ऑक्टोबर रोजी बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुन्हा एकदा पाऊस अधिक सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. शनिवारी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी, तर उर्वरित राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारपर्यंत नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी उत्तर भारतातील बहतेक भागातून माघार घेतली आहे. राज्यात पुढील काही दिवस तरी मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी पूरक वातावरण असल्याचे हवामान खात्याने कळविले आहे.

नगर जिल्हा प्रशासन अलर्ट

आज (रविवारी) देखील नगर जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने नगर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सर्तकतेचे आदेश काढले आहे. जिल्ह्यात धरणातून तसेच शेजारच्या जिल्ह्यात असणारी धरणे मात्र, जिल्ह्यातून वाहनाऱ्या नदीमध्ये संबंधीत धरणातून पाण्याचा विर्सग सुरू असल्याने नदी काठावरील गावांना सर्तक राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नदी, ओढे ओलांडता काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.