रेल्वे गाड्या पूर्ववत सुरू होणार

रेल्वे गाड्या पूर्ववत सुरू होणार

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

जगभरात दोन वर्षापूर्वी सुरु झालेल्या करोनाच्या महामारीने (Corona Pandamic) मोठा कहर केला होता. भारतातही (India) शासन यंत्रणेसह अनेक नागरिकांना आरोग्याचा (Health) मोठा परिणाम सहन करावा लागला होता. रेल्वे (Railways) गाड्यां तात्पुरत्या बंद करण्यात आल्या होत्या. आता करोनाची महामारी (Corona Pandamic) आटोक्यात आल्याने स्थिगित करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या पुणतांबा (Puntamba) (जं.) रेल्वे स्टेशनवर (Railways Station) पुन्हा नियमित थांब्यासह सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणतांबा (Puntamba) परिसर प्रवासी संस्थेने वरिष्ट स्तरावर केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. देशात पहिल्यांदा लॉकडाऊन (Lockdown) घेण्यात आला तेव्हापासून म्हणजे 25 मार्च 2020 ला प्रवासी वाहतूक रेल्वे सेवा (Railway service) तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आली होती. रेल्वेच्या प्रवासी वाहतूक करण्याच्या 166 वर्षांच्या इतिहासात असे प्रथमच घडले होते. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणार्‍या अनेक प्रवाशांमध्ये धाकधूक होती. परंतु रेल्वेचा पुणतांबा थांबा बंद होऊ नये यासाठी प्रवासी संस्थेने वरिष्ठ पातळी प्रयत्न केले होते.

कोविडमुळे प्रवासी रेल्वे गाड्यांना स्थगिती दिली होती. त्यादरम्यान मालगाड्या आणि श्रमिक रेल्वे गाड्या सुरू ठेवण्याला हिरवा झेंडा देण्यात आला होता. त्यानंतर विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आली होती. रेल्वे मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांमध्ये 1700 पेक्षा अधिक रेल्वे गाड्या नियमितपणे पुन्हा सुरू होणार आहेत. रेल्वे गाड्यांनी प्रवास करण्यासाठी तिकीट प्रणालित बदल केल्याचे संकेत रेल्वे विभागाने दिले आहे.

कोविड काळात रेल्वेगाड्या सुरु न ठेवता गाड्या स्थगित करून काही बदल करण्य्यात आले होते. आता हे बदल हळूहळू कमी करण्यात येत आहे. परंतु रेल्वे गाड्यांनी प्रवास करणार्‍या प्रवाशाांना कोविडचे नियम पाळावे लागणार आहे. नियम तोडल्यास कारवाईला सामोरे जावे लागेलँ.

पुणतांबा (जं.) रेल्वे स्टेशला थांबा कायम राहाण्यासाठी भारत सरकारचे रेल्वे मंत्रालय व वरिष्ट अधिकारी यांचे पुणतांबा परिसर प्रवासी संस्थेचे अध्यक्ष विजय धनवटे, उपाध्यक्ष विलास बोर्डे, विश्वस्त सुभाष कुलकर्णी, खजिनदार संतोष चोरडिया, सरचिटणस संजय जोगदंड, दिलीप कांबळे, भारत बोर्डे, सुनिल कुलट सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी आभार व्यक्त केले आहे.

सेंट्रल रेल्वेचे महाव्यावस्थापक मुंबई यांची पुणतांबा (जं) रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांच्या अडचणी, भुयारी मार्ग व विविध एक्सप्रेस रेल्वे गाड्यांच्या थांब्यांच्या मागणीसाठी व इतर प्रश्नावर लवकरच पुणतांबा परिसर प्रवासी संस्था भेट घेणार असल्याचे अध्यक्ष विजय धनवटे यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com