रेल्वे स्टेशनवरील मालधक्का स्थलांतरित होऊन देणार नाही

माथाडी कामगारांशी आमदार जगताप यांनी साधला संवाद
रेल्वे स्टेशनवरील मालधक्का स्थलांतरित होऊन देणार नाही
आमदार संग्राम जगताप

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आठ दिवसांपासून शहरातील रेल्वे मालधक्का दुसरीकडे हलविण्याचा चालू आलेला डाव साध्य होऊन देणार नाही. जिल्हा कृषी विकास अधिकारी यांच्या आडमुठे धोरणामुळे व चुकीच्या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकार्‍यांची दिशाभूल चालू आहे. यामुळे 600 माथाडी कामगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. अधिकार्‍यांनी चुकीचे काम करू नये, अन्यथा त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा आ. संग्राम जगताप यांनी माथाडी कामगारांना समवेत संवाद साधतांना दिला.

रेल्वे स्टेशनवरील हमाल माथाडी कामगारांसोबत आ. संग्राम जगताप संवाद साधला. यावेळी स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, नगरसेवक प्रशांत गायकवाड, प्रा. माणिकराव विधाते, सुमतीलाल कोठारी तसेच माथाडी कामगार व प्रतिनिधी उपस्थित होते. आ. जगताप म्हणाले, माथाडी कामगारांचे नेते तथा स्थायी समितीचे सभापती घुले यांनी या कामगारांच्या प्रश्नांसाठी वारंवार आंदोलने केली व प्रशासनाला निवेदने दिली. परंतु जि.प. कृषी अधिकारी यांच्या आडमुठे धोरणामुळे वाहतूकदारांशी संगनमत करून रेल्वे माल धक्का इतर स्थलांतरित करण्याचा डाव केला आहे.

जर हा मालधक्का स्थलांतरित झाला तर 600 माथाडी नोंदणीकृत कामगारांवर उपासमारीची वेळ येईल, यास जबाबदार कोण? नगर रेल्वे स्टेशन वरील मालधक्का सर्वांसाठी सोयीचा आहे. हा मालधक्का कृषी विकास अधिकार्‍याला बंद ठेवायचा आहे. यामुळे हमाल, कामगार व सहायक कामगार आयुक्त यांना ही ते दाद देत नाहीत. या ठिकाणी कार्यरत असलेले ट्रान्सपोर्ट कंपनीच्या व वाहतूकदार संघटनेच्या सोयीसाठी ही भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. हा मालधक्का स्थलांतरित होऊन देणार नाही. तसेच सदर कामगारांचा प्रश्न मार्गी न लागल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास या सर्वस्व जबाबदारी कृषी विकास अधिकारी व प्रशासनाची राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com