जुगार अड्ड्यावर छापा; २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पावणेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
जुगार अड्ड्यावर छापा; २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

श्रीरामपूर | प्रतिनिधी

श्रीरामपूर (Shrirampur) शहरातील वार्ड नंबर २ (Ward no 2) मधील बाबरपुरा, पाण्याच्या टाकीजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये पोलिसांनी (Police raid) जुगार अड्ड्यावर (gambling den) छापा टाकला. आरोपी इमतियाज अजिज शहा उर्फ बबलू (वय 32 वर्षे) याच्यासह इतर 22 जणांवर कारवाई केली. (Crime news shrirampur)

या आरोपींमध्ये काही आरोपी अल्पवयीन असल्याचे कळते. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात (Shrirampur Police Sation) याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई किशोर जाधव यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्यासह पोलीस नाईक अमोल जाधव, पोलीस नाईक बैसाणे, पोलीस शिपाई नरवडे ,पोलीस शिपाई गायकवाड आदींनी सहभाग घेतला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com