
राहुरी फॅक्टरी | वार्ताहर
आपल्या थकीत पगारासाठी गेल्या ११ दिवसापासून उपोषणाला बसलेल्या डॉ तनपुरे कारखाना (Dr Tanpure Sugar Factory) कामगार आंदोलनाबाबत (Labor movement) काहीच तोडगा निघत नसल्याने आंदोलन तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
आज गुरुवारी राहुरीच्या (Rahuri) कामगारांवर अतिक्रमण केल्याचे भावनेतून राहूरीच्या कामगारांनी प्रवरेहुन राहुरीत आलेल्या कामगाराच्या तोंडाला काळे फासले.
अनेक बैठका, निवेदने, अश्वासने व मुदत देऊनही कुठलाच मार्ग निघत नाही किंबहुना मार्ग काढला जात नसल्याची भावना कामगाराच्या मध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे युद्ध आमचे सुरू, जिंकू किंवा मरू असा नारा देत कामगारांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.