राहुरी फॅक्टरीवरील तरूणाच्या आत्महत्येप्रकरणी पुण्यातील चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल

राहुरी फॅक्टरीवरील तरूणाच्या आत्महत्येप्रकरणी पुण्यातील चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

आपली मुलगी प्रेमविवाह करणार हे समजल्यावर पुणे येथील मुलीच्या नातेवाईकांनी नेवासा येथील तरूणाला मारहाण केली. तसेच त्याला जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरून जाऊन त्या तरूणाने राहुरी तालुका हद्दीत झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे पुणे येथील चारजणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश कांतीलाल गायकवाड (वय 25, रा. मक्तापूर ता. नेवासा) या तरूणाने दि. 25 एप्रिल रोजी राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड महामार्गा लगतच्या एका शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याबाबत राहुरी पोलिसांत अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर मयताचे वडील कांतीलाल शामराव गायकवाड (रा. मक्तापूर ता. नेवासा) यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, मयत सुरेश याचे पुणे येथील एका मुलीशी प्रेम संबंध होते. ते दोघे लग्न करणार होते.

याबाबत त्या मुलीच्या घरच्या लोकांना माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी आपसात संगनमत करुन मयत सुरेश याला मारहाण करुन त्यास घरातून काढून दिले व फोन करुन तुझे व आमच्या मुलीचे संभाषण तुझ्या फोनमधून डिलीट कर, असे बोलून नेहमी शिवीगाळ करुन त्याला जिवे ठार मारण्याची धमकी देऊन त्याला मानसिक त्रास देत होते. त्यामुळे सुरेश याने आरोपींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली.

कांतिलाल गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोप राजू बिभीषन वाघमारे, उज्ज्वला राजू वाघमारे, स्वाती राजेंद्र मोरे (सर्व रा. कोंढवा ता. हवेली जि. पुणे, योगेश मोतीलाल गायकवाड रा. मक्तापूर ता. नेवासा या चारजणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com