राहुरी फॅक्टरीला महिलेस जातीवाचक शिवीगाळ व धमकी

राहुरी फॅक्टरीला महिलेस जातीवाचक शिवीगाळ व धमकी

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

भांडण सोडविण्यास आलेल्या महिलेला जातीवाचक शिवीगाळ करुन जाळून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, प्रियंका महेश देसर्डा (वय 32) रा. वैष्णवी चौक राहुरी फॅक्टरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नितीन वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटले की 11 सप्टेंबर रोजी सकाळी प्रियंका देसर्डा यांचे सासरे किशोर हे कामगार नारायण शिंदे याचे सोबत गोठ्यामध्ये काम करत होते. तेथे आरडओरडा चालू असल्याने प्रियंका देसर्डा या काय झाले, हे पाहण्यासाठी तेथे गेल्या असता नितीन बाजीराव वाघ (रा. अंबिकानगर, राहुरी फॅक्टरी) हा कामगार नारायण याला घेऊन जाण्याचे कारणाने सासरे किशोर यांना गोठ्यामध्ये येऊन लाथा-बुक्क्याने मारहाण करत होता.

तेव्हा प्रियंका देसर्डा यांनी त्यांचे भांडण सोडवून आरोपी नितीन यास तू येथून निघून जा, भांडण करू नकोस असे म्हणाल्या असता त्याचा त्याला राग आल्याने त्याने प्रियंका देसर्डा यांना जातीवाचक शिवीगाळ केली आणि तुम्ही माझ्या नादी लागले तर गोठ्यासह जाळून तुम्हाला मारून टाकीन, अशी धमकी दिली.

या फिर्यादीवरून नितीन बाजीराव वाघ यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com