राहुरी तालुक्यातील 28 पैकी 17 पाणीवापर संस्थांची निवडणूक बिनविरोध

4 संस्थांचे नामनिर्देशन पत्र अपूर्ण || चिन्ह वाटप नाही
राहुरी तालुक्यातील 28 पैकी 17 पाणीवापर संस्थांची निवडणूक बिनविरोध

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

राहुरी तालुक्यातील मुळा धरणावरील मुळा डाव्या कालव्यावरील 28 पाणीवापर संस्थांपैकी 17 पाणीवापर संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. तर 4 संस्थांचे नामनिर्देशन पत्र अपूर्णच राहिले आहेत. 4 पाणीवापर संस्थेत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याने त्या जागा रिक्तच राहिल्या. तर 3 पाणीवापर संस्थांसाठी निवडणूक प्रक्रिया लागली आहे. मात्र, ज्या संस्थेची निवडणूक लागली तेथील उमेदवारांना अद्याप देखील चिन्हाचे वाटप झाले नसल्याने शेतकरी सभासद व उमेदवार संभ्रमात पडले आहेत. त्यामुळे ही निवडणूक होणार की रद्द होणार? याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

रोकडेश्वर पाणीवापर संस्था बारागाव नांदूर, स्व.का.ल. पवार पाणीवापर संस्था बारागाव नांदूर, अहिल्यादेवी पाणीवापर संस्था राहुरी, श्री नरसोबा पाणीवापर संस्था टाकळीमिया, जगदंबा पाणीवापर संस्था तांदुळवाडी, श्री विठ्ठल पाणीवापर संस्था आरडगाव, रेणुकामाता पाणीवापर संस्था मानोरी, ब्रम्हानंद शेतकरी पाणीवापर संस्था माहेगाव, खुडसरगांव, हनुमान पाणीवापर संस्था वळण, संत गोि6ंवद बाबा पाणीवापर संस्था पाथरे, अमृतेश्वर पाणीवापर संस्था लाख, पांडुरंग पाणीवापर संस्था मालुंजा, त्रिंबकराज पाणीवापर संस्था देवळाली प्रवरा, अण्णासाहेब पाटील पाणीवापर संस्था देवळाली प्रवरा, चंद्रेश्वर पाणीवापर संस्था देवळाली प्रवरा, मियासाहेब पाणीवापर संस्था टाकळीमिया, त्रिंबकपूर, मुसळवाडी अंतिम तलाव म्हसोबा पाणीवापर संस्था मुसळवाडी, या 17 पाणी वापर संस्थेच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. तर संत बन्सी महाराज पाणीवापर संस्था कोपरे, संत कदम माऊली पाणीवापर संस्था पाथरे, गणेश पाणीवापर संस्था मानोरी, या 3 पाणीवापर संस्थेच्या निवडणुका होणार आहेत.

जय बजरंगबली पाणीवापर संस्था राहुरी, 12 पैकी 8 अर्ज त्रिमूर्ती पाणीवापर संस्था मोरवाडी, 9 पैकी 5 अर्ज छत्रपती शिवाजी महाराज पाणीवापर संस्था देवळाली प्रवरा (मोरवाडी), 9 पैकी 2 अर्ज आले होते. चंद्रगिरी पाणीवापर संस्था मांजरी, 12 पैकी 9 उमेदवारी अर्ज दाखल आहेत. या 4 संस्थांचे उमेदवारी अर्ज अपूर्ण आले आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज पाणीवापर संस्था (क्रमांक 1) बाळेश्वर पाणीवापर संस्था राहुरी, जय मल्हार पाणीवापर संस्था राहुरी, प्रसाद पाणीवापर संस्था राहुरी, या पाणीवापर संस्थेचे एकही उमेदवारी अर्ज आले नाहीत.

दि.5 ऑगस्ट रोजी निवडणूक (मतदान) सकाळी 8 ते 4 यावेळेत शक्य झाल्यास मतमोजणी आणि निकाल शक्य न झाल्यास दुसर्‍या दिवशी दि.6 ऑगस्ट रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येईल. निवडणुकीसाठी देवळाली प्रवरा पाटबंधारे विभाग शाखा उपअभियंता आर.एन.थोरे, जे.एस.सय्यद, ए.बी. सुरुंकर, आर.ए. तांबोळे हे काम पाहत आहेत.

मुळा डावा कालवा सिंचन प्रकल्प क्रमांक 2 चालू असलेली निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात यावी. कारण निवडणूक कार्यक्रम अर्ज स्वीकृती दि. 15 जुलै ते 22 जुलैपर्यंत होती. अर्जाची छाननी 25 जुलैला होती. अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख 26 जुलै असून मुदत संपून गेलेली आहे. परंतु पाटबंधारे अद्यापही अर्ज माघार घेण्यासाठी दबाव आणत आहे. तसेच निवडणूक कार्यक्रम 05 ऑगस्टला ठरलेली असून अद्याप पाणीवाटप संस्थांना निवडणूक चिन्ह मिळालेले नाही. सगळी निवडणूक ही बेकायदेशीर असून ती रद्द करण्यात यावी. या सर्व 28 पाणीवापर संस्थांना शासनाचा जीआर मिळालेला नाही. त्यामुळे निवडणूक रद्द करून या सर्व पाणीवाटप संस्था बरखास्त करण्यात याव्यात. यामुळे आम्ही लवकरच मुळा पाटबंधारे अभियंता अहमदनगर यांना भेटणार आहोत.

- बाळासाहेब पोटे, शेतकरी मानोरी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com