राहुरी विद्यापीठ |वार्ताहर| Rahuri Vidyapith

महात्मा फुले कृषी विद्यापीठात सातवा वेतन आयोग व 10/20/30 वर्षानंतरचे आश्वासीत प्रगती योजना लागू करण्यासंदर्भात

अधिकारी/कर्मचार्यांचे बेमुदत लेखणी बंद आंदोलन आठव्या दिवशीही सुरुच आहे. दरम्यान उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी समन्वय संघाच्या पदाधिकार्यांबरोबर चर्चा केली.

आंदोलनाचा कालचा 14 वा आणि लेखणी बंद आंदोलनाचा आठवा दिवस असून काल काळ्या फिती लावून महात्मा फुलेंच्या पुतळ्याजवळ घोषणाबाजी करुन आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉ. उत्तम कदम, डॉ. महाविरसिंग चौहान, डॉ. संजय कोळसे, डॉ. कैलास कांबळे, डॉ. प्रकाश मोरे, श्रीमती सुरेखा निमसे, श्रीमती वैशाली तोडमल, श्रीमती शितल जगदाळे, श्री. पी.टी. कुसळकर यांनी मागण्यांसंदर्भात मनोगत व्यक्त केले.

यावेळी राज्याचे नगरविकास, उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आंदोलनस्थळी समन्वय संघाच्या वतीने मागण्यांचे निवेदन स्वीकारले. ना. तनपुरे यांनी समन्वय संघाच्या पदाधिकार्यांबरोबर चर्चा केली. यावेळी कृषी विद्यापीठातील सर्व अधिकारी, कर्मचारी लेखणीबंद आंदोलन करत असताना शेतकर्यांसाठी कृषी सल्ला तसेच बियाणे विक्री केंद्र सुरु असल्याबद्दल त्यांनी विद्यापीठातील कर्मचार्यांचे आभार व्यक्त केले.

दि. 7 नोव्हेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा चौथा टप्पा सुरू असून आंदोलन अधिक तिव्र करण्यासंदर्भात यावेळी सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. या आंदोलनाचे आयोजन समन्वय संघाचे मच्छिंद्र बाचकर, गणेश मेहेत्रे, अजित हरिचंद्रे, महेश घाडगे, जनार्धन आव्हाड, संजय ठाणगे, मच्छिंद्र बेल्हेकर, श्रीमती सुरेखा निमसे यांनी केले.