Public Curfew : वांबोरी, विद्यापीठ परिसरात तहसिलदारांच्या पथकाने केली कारवाई

Public Curfew : वांबोरी, विद्यापीठ परिसरात तहसिलदारांच्या पथकाने केली कारवाई

उंबरे |वार्ताहर| Umbare

पंधरा दिवस जनता कर्फ्यूचा आदेश आल्यानंतर देखील नियमांचे उल्लंघन करणार्‍या नागरिकांवर

उपविभागीय प्रांतअधिकारी दयानंद जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार फसियोद्दीन शेख, पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, मुख्याधिकारी श्रीनिवास कुर्हे यांच्या संयुक्त पथकाने नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर धडक कारवाई केली.

वांबोरी येथे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या देणार्‍या सुधीर नागपाल या मेडिकल दुकानदारावर पाच हजार रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर महात्मा फुले कृषी विद्यापीठासमोर असणार्‍या फळ विक्रेत्यांवर देखील दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. विद्यापीठात कॅनॉलला पोहणार्‍या तरूणांवर देखील कारवाई करण्यात आली आहे.

काल सकाळपासून या संयुक्त पथकाने ठिकठिकाणी धडक कारवाई केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com