राहुरी विद्यापीठाच्या 35 पीकवाणाचे पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण

राहुरी विद्यापीठाच्या 35 पीकवाणाचे पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण
राहुरी कृषी विद्यापीठ

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

पर्यावरणीय अनुकुलता कृषी विकासाकरीता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात संशोधित केलेल्या 35 पीक वाणांचा राष्ट्रीय स्तरावर लोकार्पण कार्यक्रम पार पडला.

हा कार्यक्रम महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र तसेच कृषी विद्यापीठांतर्गत 10 जिल्ह्यांमध्ये कार्यरत असणारे विविध महाविद्यालये, कृषी विज्ञान केंद्रे, संशोधन केंद्र या ठिकाणी आयोजित करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील हे नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात तर डॉ. शरद गडाख हे कृषी विज्ञान केंद्र, धुळे या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. राहुरी कृषी विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमासाठी डॉ. प्रमोद रसाळ उपस्थित होते.

लोकार्पण केलेले 35 पीक वाण हे ताण सहनशील, जास्त उत्पन्न देणारे तसेच आरोग्यास पोषक असणार्‍या अशा विविध पिकांच्या वाणांचा समावेश यात आहे. विशेष महत्वाचे म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीने प्रसारीत केलेल्या ज्वारी पिकाच्या फुले अनुराधा व एस.एस.एच. 47 या दोन वाणांचा समावेश यामध्ये आहे. या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com