मुसळवाडीसह नऊगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया रद्द

आरडगाव l वार्ताहर l Aaradgoan

'अध्यक्ष पदाची निवड लोकशाही पध्दतीने न करता दबावतंत्राचा वापर करून रद्द करण्यास भाग पाडले व अचानक सतरावा सदस्य आला कुठुन?' असा आरोप मुसळवाडीसह नऊगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या (Musalwadi Water scheme) सरपंचांसह सदस्यांनी केल्याने या कारणांमुळे निवड प्रक्रिया वादात गेल्याने शेवटी काही काळ गोंधळ निर्माण होऊन निवड प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.

राहुरी (Rahuri) तालुक्याच्या पुर्वभागतील गेल्या एक महिन्यापासून बंद असलेल्या मुसळवाडीसह (Musalwadi) नऊगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या अध्यक्षपदाची निवड राहुरी पंचायत समितीच्या स्व डॉ. दादासाहेब तनपुरे सभागृहात सोमवार दि. 28 जुन रोजी आयोजित करण्यात आली होती. मुसळवाडीसह (Musalwadi) मांलुजे खर्द (Malunje Khurd), महालगाव (Mahalgoan), माहेगाव (Mahegoan), खुडसरगाव (Khudsargoan), पाथरे (Pathare), शेनवडगाव (Shenvadgoan), कोपरे (kopre), तिळापुर (Tilapur), वांजुळपोई (Vanjulpoi) या गावांच्या सरपंचासह प्रत्येकी दोन असे सोळा सदस्य उपस्थित होते. हि निवड राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गोविंद खामकर (Govind Khamkar) यांच्या मार्गदर्शना खाली व विस्तार अधिकारी फगारे, आनंत परदेशी (Anant Pardeshi) ग्रामविकास अधिकारी तथा सचिव सुरेश डोंगर (Suresh Dongre) यांच्या प्रमुख उपस्थिती झाली.

अध्यक्ष निवडताना प्राधान्याने योजनेचे पाणी वापरणाऱ्या व नियमित भरणा करणाऱ्यांना मिळावे अशी सुचना काही सदस्यांनी मांडली. पंरतु त्यावर सर्व सदस्यांचे एकमत न झाल्याने निवड प्रक्रिया मतदान पध्दतीने घेण्याचे ठरले. मतदान प्रक्रिया सदस्यांना बोट वरती करुन घेण्यात येईल असे सचिव डोंगरे यांनी सांगितले. त्यास काही सदस्यांनी विरोध करुन निवडणक ही लोकशाही (Democracy) मार्गाने म्हणजेच गुप्त मतदान पध्दतीने करण्याचा आग्रह धरला असता निवडणूक निर्णय अधिकारी परदेशी यांनी गुप्तमतदान घेण्याची सूचना केली. पाणी योजणेवर प्रत्येक ग्रामपंचायतने ठराव घेऊन पाठवलेल्या दोन सदस्यांच्या यादीचे वाचन करण्यात आले असता आठ ग्रामपंचायतचे सोळा सदस्यांचे नावे जाहीर केले. प्रत्यक्षात निवडणूक प्रक्रिया सुरू करताना मात्र सतरा सदस्य असतील असे सचिव डोंगरे यांनी सांगितले. त्यास योजनेचे सदस्य श्रीकांत जाधव व पंकज आढाव यांनी आक्षेप घेऊन सचिवांनी पाठवलेली सोळा सदस्यांची नावे निवडणूक निर्णय अधिकारी परदेशी यांच्या निदर्शनास आणून दिले.

सचिवांच्या मनमानी निवड प्रक्रिया वादात गेल्याने शेवटी काही काळ गोंधळ होऊन निवड प्रक्रिया स्थगित करण्यात आली. त्यामुळे या गावांना पिण्याच्या पाण्याची गरज आहे पाणी पुरवठा सुरळीतपणे सुरु करावी आशी मागणी केली जात आहे.

शंभर टक्के हि गांवे या योजनेवर अवलंबून आसल्याने या पाणी योजनेच्या पाईपलाईनमधून गळती खुप आहे. शारयुक्त पिवळ्या रंगाचे पाणी येणे, वेळेवर पाणी न येणे, अशुद्ध पाणी पुरवठा होणे त्यामुळे हि योजना थकबाकी जाऊन एक महिन्यापासून बंद आहे. पाणी योजना चालू करण्याचे सोडून यांना अध्यक्ष पदाच्या निवडचे पडले आहे. लोकांना पाणी पाजा नंतर निवडी करा.

सौ.शारदा आढाव, सरपंच माहेगांव

गेल्या १९ वर्षांपासून आतापर्यंत ज्या कोणत्या गावांकडे ही योजना चालवायला होती त्यांनी आतापर्यंत कधी ही शुद्ध पाणी येऊ दिले नाही हे काम मनावर न घेतल्यामुळे ही योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे या योजनेची खऱ्या अर्थाने आम्हाला गरज आहे आमची गावे पिण्याच्या पाण्यासाठी या योजनेवरच अवलंबून आहे त्यामुळे या गावांचा विचार करून अध्यक्ष निवड करावी

श्रीकांत जाधव, सदस्य, पाथरे

शेनवडगाव कोपरे या ग्रुप ग्रामपंचायतीची तीन सदस्य या योजनेवर असावे त्यामुळे हा मुद्दा उपलब्ध झाला. थकबाकी व वसुली योजना बंद पडणाच्या मार्गावर आहे. राजकारण विरहित चांगले सदस्य योजनोवर देऊन हि योजना सुरळीत करीव अध्यक्ष पदाची निवड निवन सदस्य करण्याचा निर्णय झाल्या मुळे रद्द करण्यात आली.

सुरेश डोंगर,सचिव व ग्रामविकास अधिकारी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com