राहुरीचा टेम्पो एमआयडीसी हद्दीतून पळवला

गुन्हा दाखल : नगर-मनमाड रोडवरील घटना
राहुरीचा टेम्पो एमआयडीसी हद्दीतून पळवला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर-मनमाड रोडवर (Nagar Manamad Road) एमआयडीसी पोलीस (MIDC Police Station) ठाण्याच्या हद्दीतून हॉटेल रुस्तम (Hotel Rustam) समोरून सहा लाख रुपये किंमतीचा राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) देसवंडी फाटा (Deswandi Phata) येथील 407 टेम्पो चोरट्यांनी पळविला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime at MIDC Police Station) दाखल झाला आहे.

याप्रकरणी देवसंडी फाटा (Deswandi Phata) येथील शिवाजी पवार यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) फिर्यादी दिली आहे. दि. 6 रोजी रात्री 10 ते दि. 7 रोजी सकाळी 8 वाजेच्या दरम्यान नगर-मनमाड रोडवर (Nagar Manmad Road) हॉटेल रुस्तम समोरून सहा लाख रुपये किंमतीचा एमएच 17-बी.वाय. 6370 हा चोरट्यांनी पळून नेला. या चोरी प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास अरूणा गांगर्डे या करत आहे. गेल्या काही दिवसांत रात्रीच्यावेळी एमआयडीसी परिसर (MIDC) आणि नगर-मनमाड रोडवरील गुन्ह्यात वाढ झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com