श्री संत कवी महिपती महाराजांच्या पालखीचे औपचारिक पद्धतीने पंढरीकडे प्रस्थान

श्री संत कवी महिपती महाराजांच्या पालखीचे औपचारिक पद्धतीने पंढरीकडे प्रस्थान

ताहाराबाद | वार्ताहर

श्री संत कवी महिपती महाराजांच्या पालखी सोहळ्याचे (Shri Sant Kavi Mahipati Maharaj Palkhi) सालाबाद प्रमाणे औपचारिक पद्धतीने पंढरीकडे (Pandharpur) प्रस्थान झाले.

श्री संत कवी महिपती महाराजांच्या पालखीचे औपचारिक पद्धतीने पंढरीकडे प्रस्थान
राळेगणसिद्धीतील सर्व नागरिकांची होणार 'करोना टेस्ट'

कोविड-१९ च्या (COVID19) पार्श्र्वभूमीवर‌ श्री क्षेत्र ताहाराबाद (Tarahbaad) जवळील मल्हारवाडी (Malharvadi) येथील वारकरी सांप्रादायाची परंपरा असलेल्या ॲड. सुभाष रामचंद्र घाडगे (Adv. Subhash Ramchandra Ghadge) यांच्या वस्तीवरील पर्णकुटीत पालखीची व्यवस्था करण्यात आली आहे. सालाबाद प्रमाणे परंपरा खंडित होऊ नये म्हणून औपचारिक पद्धतीने पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

टाळ-मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष आणि श्री संत कवी महिपती महाराजांच्या जय-जयकारात प्रति पंढरपूर असलेल्या श्री क्षेत्र ताहाराबाद येथील भावभक्तीने भरलेला महिपती महाराजांचा पायी दिंडी सोहळा काल विधीवत पूजनानंतर विठुरायाच्या भेटीला मार्गस्थ झाला.

श्री संत कवी महिपती महाराजांच्या पालखीचे औपचारिक पद्धतीने पंढरीकडे प्रस्थान
Video : जिरायती टापूत तासभर जोरदार पाऊस

प्रतिपंढरपूर असलेल्या श्री क्षेत्र ताहाराबाद येथे महिपती महाराजांच्या समाधी मंदिरात देवस्थानचे नवनिर्वाचित विश्वस्त राजेंद्र साबळे सपत्नीक यांच्या हस्ते पालखीचे विधीवत पूजन झाले. संत कवी महिपती महाराजांच्या समाधी मंदिर प्रांगणात दिंडीचा पहिला रिंगण सोहळा पार पडला. अश्वांचे टाळ-मृदुंगाच्या ठेक्यात आणि ज्ञानोबा-तुकारामाच्या गजरात पडलेले पदन्यास, फटाक्यांची आतषबाजी, सनई चौघड्यांचा सूर, नानाविध फुलांची उधळण या भारून टाकणाऱ्या वातावरणात भगव्या पताका धारण केलेल्या वारकऱ्यांची पावले पंढरीच्या दिशेने निघाली. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी श्रीक्षेत्र ताहाराबाद ला वारकऱ्यांची उत्कंठा लागली होती.

आज मंगळवार (दि.६) सकाळी ११ वाजता दिंडीचे प्रस्थान झाले. प्रारंभी श्री पांडुरंगाच्या मंदिरात बाबासाहेब वाळुंज यांच्या हस्ते पालखी पूजन झाले. देवस्थान विश्वस्त आसाराम ढूस यांनी पायी दिंडी सोहळ्याची आख्यायिका सांगून वारीचे महत्त्व सांगितले. प्रास्तविक सुरसिंग पवार यांनी केले. राहुरी तालुका वारकरी संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण बानकर यांनी सोहळ्याला शुभेच्छा दिल्या. विधिवत पूजन व आरतीनंतर हा सोहळा मल्हारवाडी कडे मार्गस्थ झाला. यावेळी देवस्थानचे उपाध्यक्ष अविनाश कांबळे, आसाराम ढूस, बाळकृष्ण बानकर, शिवाजी बंगाळ, ॲड. अशोक किनकर, दत्तात्रय जगताप, रमेश नालकर, अशोक हांडे, मच्छिंद्र कोहकडे, सुभाष शिरसाठ, दत्तात्रय मुसमाडे, श्रीकृष्ण कांबळे, संजय कांबळे, बापु साहेब गागरे, शिवाजी कोळसे, नाना महाराज गागरे, बाळकृष्ण महाराज कांबळे,श्रीमती सुशीला वराळे, सुगंधाबाई बानकर, सुशीला मुसमाडे, लक्ष्मी बाई सोनवणे, सविताताई साबळे सचिव बाळासाहेब मुसमाडे, भालदार चोपदार-राजू चव्हाण, कांता कदम, राजू झुगे, कामगार पोलीस पाटील किरण उदावंत,नारायण झावरे, सिताराम झावरे, तानाजी हारदे, रमेश हारदे, दत्तात्रय हारदे, वेणुनाथ औटी, दिलीप बिडवे, बाबासाहेब झावरे, दिलीप हारदे, राजेंद्र झावरे, ज्ञानेश्वर माने आदींसह भाविक उपस्थित होते.

आषाढ वद्य नवमीला पालखी सोहळ्याचे पंढरी कडुन श्रीक्षेत्र ताहाराबाद येथे आगमन होते. ताहाराबादचा पालखी सोहळा पांडुरंगाच्या भेटीला जात नसून पांडुरंगाला ' मूळ ' जात असतो, ही आख्यायिका आहे. आषाढ वद्य नवमी पासून श्रीक्षेत्र ताहाराबाद येथे पांडुरंग उत्सवास प्रारंभ होत असतो. परंतु कोविड-१९ मुळे सर्व धार्मिक उत्सव मृगजळ ठरत असून वारकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com