राहुरी तालुक्याच्या पूर्व भागात रानडुकरांचा उपद्रव

शेतकरी हैराण
राहुरी तालुक्याच्या पूर्व भागात रानडुकरांचा उपद्रव

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

राहुरी तालुक्याच्या पूर्वभागातील गेल्या अनेक दिवसांपासून रानडुकरांचा उपद्रव सुरू असून यामुळे शेतकर्‍यांचे पशुधन धोक्यात आले आहे.वन विभागाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे.

तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या अनेक दिवसांपासून रात्रीच्या वेळी रानडुकरांचा उपद्रव वाढला आहे. ते ऊस, मका, घास यासारखे शेतातील उभी पिके जमीनदोस्त करीत असल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. रात्रीच्या वेळेस रानडुकरांचे टोळके शेतात शिरून पिकांची नासाडी करत आहे.

त्यासाठी काही शेतकर्‍यांनी रानडुकरांपासून पिकांच्या सरंक्षणासाठी अनेक उपायोजना करून हा उपद्रव सुरूच असल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. रानडुकरांची संख्या जास्त असल्याने मका, घास, ऊस आदी पिकांना याचा फटका बसत असल्याने या रानडुकारांच्या टोळक्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com